Breaking News

Tag Archives: mesma act

शिंदे-फडणवीस सरकारची खेळीः आश्वासन देत संप मिटविला, मात्र ६ महिन्यासाठी घातली बंदी वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यातंर्गत पुढील ६ महिने आंदोलन करण्यास बंदी

वीज कंपनीचे खासगीकरण करणार नसल्याचे आश्वासन देत संप संपुष्टात आणला, मात्र वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप मागे घेताच, शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करत पुढील ६ महिने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यावर बंदी घातली. विशेष म्हणजे संपकरी वीज कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर रात्री उशीराने यासंदर्भातील अध्यादेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री …

Read More »

कर्मचाऱ्यांची पगार वाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही…अन्यथा मेस्माखाली कारवाई परिवहन मंत्री अनिल परब यांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

मराठी ई-बातम्या टीम काही जणांकडून एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पगारवाढ ही फसवी आहे ती मागे घेतली जाणार अशा पध्दतीचे वृत्त पसरविले जात आहे. मात्र त्यात तथ्य नसून दिलेली पगारवाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही तर मात्र मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट …

Read More »

अखेर मेस्मा कायद्यातून अंगणवाडी सेविकांना तूर्त दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणावाडी सेविकांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असूनही त्यांना मेस्मा कायद्याखाली आणल्याच्या निषेधार्थ शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत आणि विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. तसेच दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे शिवसेनेसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेसमोर माघार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्मा कायद्याखाली अंगणवाडी सेविकांच्या समावेशाला स्थगिती देण्याचा …

Read More »

अंगणवाडी सेविकांच्या `मेस्मा’ प्रकरणावरून विधान परिषदेत गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ताधारी शिवसेनेने कडाडून विरोध केल्यामुळे बुधवारी विधान परिषदेचे कामकाज सुरूवातीला तीनदा तर नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. बुधवारी सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. तेव्हा शिवसेनेचे गटनेते अॅड. अनिल परब …

Read More »

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर शिवसेना विरूध्द भाजप, भाजप-सेना विरूध्द काँग्रेस मेस्माचे पाप आघाडी सरकारच्या काळातले भाजप-सेनेचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांची नियुक्ती कंत्राटी पध्दतीवर असूनही त्यांना मेस्मा कायद्याच्या खाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याप्रश्नावर शिवसेनेने आज सकाळपासूनच विधानसभेचे कामकाज रोखून धरत दिवसभर गोंधळ घालण्यात येत होता. मात्र दुपारनंतर शिवसेनेने सरकार विरोधातील आपला रोख बदलत या मेस्मा कायद्यास आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी …

Read More »

हिंमत असेल तर ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळात विरोध करून दाखवा शिवसेनेच्या नौटंकीवर विरोधकाचे टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्यासंदर्भात सरकारची भूमिका चुकीचीच आहे. हा निर्णय रद्द झालाच पाहिजे. पण शिवसेनेने यासंदर्भात सभागृहात गोंधळ घालून राजदंड उचलणे म्हणजे शुद्ध नौटंकी आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध करून दाखवावा, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी …

Read More »

मेस्मा कायदा लागू करण्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न : विधानसभेचे कामकाज बंद पाडले

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत सकाळी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच शिवसेनेचे आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला मेस्मा कायदा रद्द करण्याच्या मागणीवरून जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर सभागृहात मेस्मा कायदा रद्द करण्याबाबतचा फलकही फडकाविला. शिवसेना आमदारांमुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब …

Read More »