Breaking News

Tag Archives: karnataka

अजित पवारांचा आरोप, कर्नाटक आता महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी पळविण्याच्या प्रयत्नात राज्याच्या हिश्श्याचे पाणी आणि पर्यावणाला धोका

महाराष्ट्रविरोधी कुरघोड्या कर्नाटक सरकारने केल्यानंतर आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणी हिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली. विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर अजित पवार यांनी …

Read More »

अजित पवारांच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री शाहंना पत्राद्वारे कळविणार मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही

विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारने काल विधानसभेत कर्नाटक सरकारच्या विरोधात ठराव मंजूर केला. त्यानंतरही कर्नाटकचे विधि मंत्री मधुस्वामी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य केले. तसेच मुंबईवर दावाही केल्याची माहिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावरून अजित पवार यांनी कर्नाटकला ताकीद देण्याची मागणी केली. …

Read More »

अजित पवार म्हणाले, ताकीद द्या… कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत आहेत

कर्नाटकचे विधी मंत्री मधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी त्यांच्या विधानसभेत केली आणि मुंबईत २० टक्के कन्नड लोक राहतात असा जावईशोधही लावला आहे. कर्नाटकचे विधानपरिषदेचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई तर कर्नाटकचीच आहे असा दावा करुन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात कन्नड नाहीत का? असा …

Read More »

अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने… कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल कर्नाटकात बोलत असताना महाराष्ट्राला एक इंचही जमिन देणार नसल्याची भूमिका जाहिरपणे मांडत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका मांडली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना इशारा दिला. अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आपण वाट पहात …

Read More »

अजित पवार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ठरलेले कोण मोडतोय… कर्नाटक सरकारच्या आगळीकीनंतर अजित पवारांचा सवाल

कर्नाटक विधानसभेचं बेळगावात आजपासून अधिवेशन सुरु होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच, कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आलं असून, जमावबंदीचे आदेश देण्यात आलं आहेत. मराठी नेत्यांची धरपकडही करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, सीमाप्रश्नाची बैठक फक्त १५ मिनिटात झाली? सीमाप्रश्नी होयबा मुख्यमंत्री दिल्लीची वाट पहात होते का?

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. मात्र ही बैठक फक्त १५ मिनिटात आटोपल्याबाबतचा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून विचारला असता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयावरची बैठक फक्त १५ मिनिटात कशी काय पार पडली?. असो त्या बैठकीत काय ठरले ते ठरले. …

Read More »

त्या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांचा सवाल, आपले मुख्यमंत्री गप्प का? कन्नडींगाकडून ट्रकला पुन्हा काळ फासलं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता आणखी विकोपाला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वाहनावर कन्नड रक्षण वेदिका संघटने कडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापलं होतं. हे वातावरण निवळत असताना आज पुन्हा कर्नाटकातील गदग मध्ये महाराष्ट्रातील एका ट्रकवर काळे फासण्यात आल्याचा प्रकार समोर येताच शिवसेना युवानेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा टोला, आता कर्नाटकसाठी महाराष्ट्रातील गावे पळवणार का? गुजरातमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून एकाबाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा सातत्याने अवमान केला जात आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील उद्योग पळवून नेले जात असताना कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातील गावांवर दावा केला जात आहे. या घडामोडींच्या विरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मोदी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार …

Read More »

काँग्रेस नेते थोरात यांचा सवाल, हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? सीमा भागातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी

सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच …

Read More »

कर्नाटकातील हल्ल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले, पंतप्रधान आणि अमित शाहच्या कानी घालणार महाराष्ट्र सांम्यजसाची भूमिका घेतेय

कर्नाटकच्या आगळीकीनंतरही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कर्नाटकबाबत चकार शब्द काढला जात नाही. आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतरही किमान कर्नाटकला इशारा देण्याचे सोडाच उलट शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार असल्याचे वक्तव्य करत आपली चमडी बचावू भूमिका दाखविली आहे. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …

Read More »