Breaking News

Tag Archives: gosikhurd dam

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करा पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

पर्यटन ठिकाणांच्या यादीत आता गोसीखुर्दचा समावेशः सामंजस्य कराराच्या निमित्ताने शिक्कामोर्तब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी संधी असून या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, उजनीसह या पाच मोठ्या धरणातील गाळ काढणार… विधान परिषदेतील चर्चे दरम्यान फडणवीसांची घोषणा

उजनीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्याच्या कामासाठी नव्याने समिती स्थापन करण्यात आली असून समितीमार्फत प्रारूप, निविदा, कागदपत्रे तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. येत्या एक दीड महिन्यात यासंदर्भातील मानके तयार करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासोबतच राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजना …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचा टोला, आम्हाला समृध्दीचा गोसीखुर्द होऊ द्यायचा नव्हता अजित पवारांवरील पूर्वीच्या आरोपांवरून मुख्यमंत्र्यांचा टोला

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कालपासून विरोधकांच्यावतीने विदर्भ-मराठवाड्यातील अनुशेषाच्या अनुषंगाने नियम २९३ खाली प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक आमदारांनी मराठवाडा आणि विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी काही सूचना केल्या तर काही जणांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. या संपूर्ण झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण, प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करा

राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत  आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. …

Read More »

भंडारा शहरातही धावणार मेट्रो

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत बैठक झाली. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे …

Read More »