Breaking News

Tag Archives: enforcement directorate-ED

आदेशाला २४ तास उलटत नाही तोच ईडीची पुन्हा हसन मुश्रीफांवर धाडः चौकशीला सोमवारी या दिड महिन्यात दुसऱ्यांदा ईडीची कारवाई

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केली की ईडीची कारवाई होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर २४ तास उलटण्याच्या आधीच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांचा हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील …

Read More »

साडेचार तासाच्या चौकशीनंतर आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले, शुन्य खर्च आला.. जंबो कोविड सेंटर उभारणी महापालिकेला शक्य नव्हती

कोरोना काळात मुंबई महापालिकेने कोविड सेंटरच्या वाटपात आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायलाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल नोटीस बजावत आज चौकशीसाठी पाचारण केले. याप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांची …

Read More »

हसन मुश्रीफ यांचा आरोप, किरीट सोमय्याकडून विशिष्ट लोकांना लक्ष्य नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि अस्लम शेख यांची नावे घेतल्याने केला आरोप

आज ईडीने पहाटेपासून हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलीच्या घरावर छापे टाकत सर्व कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यातच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे नाव घेतले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत सोमय्या हे फक्त विशिष्ट …

Read More »

अतुल लोंढेची टीका, सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठीच भाजपाकडून ईडीचे छापे किरिट सोमय्यांनी आधी आरोप केलेल्या प्रकरणांचे काय झाले ?

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापे मारले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. भारतीय जनता पक्ष हा सीबीआय, आयकर, ईडी सारख्या तपास यंत्रणांचा विरोधी पक्षांना नाहक त्रास देण्यासाठीच गैरवापर करत असल्याचे देशाने पाहिले आहे. ईडीची आजची छापेमारी ही त्याचाच एक भाग असून सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीचे छापेः कार्यकर्त्ये आक्रमक निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न

साधारणतः चार वर्षापूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मनिलॉंन्डरींग केल्याचा गंभीर आरोप केला. त्यावेळी त्यांच्या घरावर छापेमारी झाली. मात्र त्यावेळी आयकर विभागाने त्यांच्या घरासह …

Read More »

ईडीकडून अखेर साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची संपत्ती जप्त अनिल परब यांची १०.२० कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केल्याचे प्रसिध्द पत्रकान्वये दिली माहिती

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आरोप केले. त्यानंतर ईडीने अनिल परब यांची दोन ते तीन वेळा चौकशी केली. परंतु त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली नाही. अखेर आज ईडीने अनिल परब यांची साई रिसॉर्टसह १० कोटी २० लाख …

Read More »

शिंदे गटाच्या आमदार-खासदारांवरील कारवाईप्रश्नी ईडी विरोधात याचिका अँड. नितीन सातपुते यांनी दाखल केली याचिका

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे आमदार आणि खासदारांना ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने नोटीसा पाठविल्या. मात्र ज्यांना नोटीसा पाठविल्या त्या आमदार-खासदारांनी शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारत भाजपाशी हातमिळवणी केली. त्यानंतर या ईडीने काय कारवाई केली? की या सर्वांनी भाजपाशी हातमिळवणी केली म्हणून पुढची कारवाई …

Read More »

नवाब मलिक यांना दिलासा नाहीच

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज ३० नोव्हेंबर मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण, न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पीठासमोर मलिक …

Read More »

ईडीचे वाईट दिवसः न्यायालय म्हणते संजय राऊतांच्या जामीनावरील याचिका ऐकू शकत नाही

पीएमएलए अर्थात ईडी न्यायालयाने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या कथित पत्रा चाळ प्रकरणी जामीन मंजूर केला. मात्र ईडीने याप्रकरणी तातडीने संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु त्यावेळी उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास निकाल दिला. त्यानंतर पुन्हा एकदा ईडीने सुधारीत याचिका दाखल करत …

Read More »

भास्कर जाधव म्हणाले, ईडी पुन्हा कोणाच्या कुटुंबाला त्रास देणार नाही

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित आहे. या निकाला नंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला निशाणा लक्ष करीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडयला सुरुवात झाली. तर दुसरीकडे न्यायालयाने संजय राऊत यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे ईडीवर ओढल्यानंतर ठाकरे गटाचे नेते …

Read More »