Breaking News

ईडीकडून अखेर साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची संपत्ती जप्त अनिल परब यांची १०.२० कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केल्याचे प्रसिध्द पत्रकान्वये दिली माहिती

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आरोप केले. त्यानंतर ईडीने अनिल परब यांची दोन ते तीन वेळा चौकशी केली. परंतु त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली नाही. अखेर आज ईडीने अनिल परब यांची साई रिसॉर्टसह १० कोटी २० लाख रूपयांची जमिन असलेली संपत्ती जप्त केली. यासंदर्भात ईडीने विस्तृत माहिती देणारे प्रसिध्दी पत्रकही जारी केले.

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई झाली असून ईडीने यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढले आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्ता १०.२० कोटींची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे.

ईडीने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्या. त्यामुळेच ईडीने मुरुड दापोली मधली ४२ गुंठे जमीन आणि साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबर रोजीच ट्विट करत ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची यादी जाहीर केली होती. या नेत्यांवर नव्या वर्षात मोठी कारवाई होणार, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता अनिल परब यांच्यावर पहिली कारवाई ईडीकडून करण्यात आली.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *