Breaking News

साडेचार तासाच्या चौकशीनंतर आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले, शुन्य खर्च आला.. जंबो कोविड सेंटर उभारणी महापालिकेला शक्य नव्हती

कोरोना काळात मुंबई महापालिकेने कोविड सेंटरच्या वाटपात आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायलाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल नोटीस बजावत आज चौकशीसाठी पाचारण केले. याप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांची जवळपास साडेचार तास चौकशी केली. चौकशीनंतर इक्बालसिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी कोविड काळात महापालिकेने केलेल्या कामाची माहिती दिली.

चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले, मार्च २०२० मध्ये जेव्हा भारतात कोविडचा शिरकाव झाला. तेव्हा आपल्याकडे केवळ ३ हजार ७५० बेड होते. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ४० लाख असताना हे बेड फार कमी होते. त्या काळात मुंबईत कोरोना संसर्गाचे लाखो रुग्ण आढळतील, असा एक अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज पुढे खराही ठरला. मुंबईत ११ लाख कोविड रुग्ण आढळल्याचे सांगितले.

त्या काळात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने मोकळ्या मैदानात जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बीएमसीने राज्य शासनाला निवेदन दिलं की, महापालिका कोरोना लढ्यात फार व्यग्र आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयाचं बांधकाम करू शकत नाही. आमच्याकडे तेवढा वेळ नाही. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी उभारण्यात आलेले कोविड सेंटर बिगर सरकारी संस्थांनी बांधले. त्यामुळे हे कोविड सेंटर उभारण्यात बीएमसीला शून्य रुपये खर्च आला. मुंबईत असे एकूण दहा जम्बो कोविड सेंटर बांधण्यात आले. यातील एका जंबो कोविड सेंटरबाबात मुंबई पोलिसांकडे एक तक्रार दाखल झाली, अशी प्रतिक्रिया चहल यांनी दिली.

दरम्यान, भाजपाचे माजी खासदार जंबो कोविड सेंटरच्या कंत्राटात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तीला पात्रता नसताना दिला असल्याचा आरोप करत शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *