Breaking News

Tag Archives: election commission of india

प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो का? निवडणूक आयोग तटस्थता जपेल का?

राज्यातील शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचे चिन्ह कोणाचे यावरून सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुनावणी आहे. मात्र काल बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबतचा पुढील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेण्यास परवानगी देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर बोलताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली. …

Read More »

ठाकरेंच्या याचिकांवर निर्णय घेण्याआधी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा देत दिला निकाल

राज्यातील सत्तासंघर्षावरील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या एकाही याचिकेवर निर्णय देण्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मागील सुनावणीवेळी एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज दिवसभर सुनावणी घेत शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उध्दव ठाकरे गटाकडून शिंदे यांच्यासह १६ जणांच्या अपात्रतेसह जवळपास चार याचिका …

Read More »

न्यायालयात सुनावणी सुरु असताना उध्दव ठाकरे म्हणाले, कितीही अफजलखान आले तरी… ज्यांच्यासाठी खस्ता खाल्या ते खोक्यात गेले

राज्यातील शिवसेना कोणाची यावर आज सर्वोच्च न्यायालयात सकाळपासून सुनावणी सुरु आहे. उध्दव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर पुढील सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेचा याचिकांवर निकाल द्यावा मात्र शिवसेनेबाबतची सुनावणी निवडणूक आयोगाने घ्यायला परवानगी द्यावी यावरून मागणी …

Read More »

ठाकरे विरूध्द शिंदेः घटनापीठाने सांगितलं, २७ सप्टेंबरला सांगणार काय करायचे ते निवडणूक आयोगाच्या सुनावणीबाबत देणार निर्णय

राज्यातील शिवसेनेतील फुटीमुळे खरी शिवसेना कोणाची यावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा की नाही यासह सर्व याचिकांवरील निर्णय येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सांगत सुनावणी तहकूब केली. निवडणूक चिन्हासंदर्भात …

Read More »

सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणाले, धनुष्यबाण विषयीचा निर्णय आम्ही घेऊ उध्दव ठाकरेंना दिलासा; निवडणूक आयोगाला फटकारले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यास आता १२ खासदारांनीही पाठिंबा दिला. शिंदें गटाकडून आता शिवसेनेवर दावा करण्यात येत असताना आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरु केली. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाकडून …

Read More »

निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांची ‘ती’ विनंती केली मान्य दिली चार आठवड्यांची मुदत

शिवसेनेतील बंडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील कायदेशीर लढाई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दोन दिवसानंतर सुनावणी होणार आहे. मात्र निवडणूक आयोगास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केलेली असली तरी पक्ष नेमका कोणाचा याप्रकरणी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरु ठेवण्यास एकप्रकारे मान्यता दिली. या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात नुकतीच केंद्रीय …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला सूचना वजा आदेश, सध्या निर्णय घेवू नका याचिकेत आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रवेश -पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार

सर्वोच्च न्यायालयात काल अपुरी राहिलेल्या सुनावणी आज घेण्यात आली. एकनाथ शिंदे गटाकडून हरिष साळवे यांनी बाजू मांडताना काही सुधारीत मुद्दे उपस्थित केले. त्यावर उध्दव ठाकरे यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद केला. मात्र या याचिकेत निवडणूक आयोगानेचे वकिल अरविंद दातार यांनी आज आपली बाजू मांडताना निवडणूक आयोगाच्या कामकाजात सर्वोच्च …

Read More »

एकनाथ शिंदेंबरोबरील संघर्षात उध्दव ठाकरे यांना पहिला मोठा दिलासा निवडणूक आयोगाच्या नोटीसीला स्थगिती

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यातील १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र अद्याप तरी न्यायालयाकडून अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यातच शिंदे आणि ठाकरे यांच्यातील …

Read More »

मतदार कार्डाशी आधार कार्ड जोडणे आवश्यक, पण नसेल तर ‘ही’ कागदपत्रे जोडा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने …

Read More »

गुलाबराव पाटील म्हणाले, धनुष्यबाण आमचाच… शिवसेना अद्याप सोडली नाही

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावित वेगळी चूल मांडणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी १२ जणांच्या विरोधात अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. याच परिस्थितीत निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नोटीस बजावित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या दोघांमधील संघर्ष आता निवडणूक …

Read More »