Breaking News

Tag Archives: election commission of india

कंपन्या, खासगी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी निवडणूक आयोगाचे कामगार आयुक्तांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत. राज्य शासनाने याविषयी दिनांक 25 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले …

Read More »

शासकीय संकेतस्थळांवरील मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती तात्काळ बंद करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची निवडणूक अधिका-यांकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना अद्यापही शासकीय संकेतस्थळांवरती मुख्यमंत्री आणि शासनाच्या जाहिराती दिसत आहेत. https://cmo.maharashtra.gov.in/ , https://maharashtra.mygov.in या शासकीय संकेतस्थळावर अद्याप मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती झळकत आहेत. हा सरळसरळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे. या जाहिराती तात्काळ बंद करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा …

Read More »

घरबसल्या एका क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती मतदात्यांसाठी निवडणूक आयोगाची खास वेबसाईट

मुंबई : प्रतिनिधी मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा समावेश आहे. अनेक मतदारांना आपले मतदार ओळख क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती नसते. मतदानादिवशी मतदारयादीतील …

Read More »

अधिसूचना जारी, उमेदवारी अर्ज आजपासून दाखल होणार निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेस सुरूवात

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या कार्यक्रमास आता प्रत्यक्षात सुरुवात झाली असून निवडणूकीसाठी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल आता करता येणार आहे. राजकिय पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांना त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थात निवडणूक अधिकाऱ्यांकडे आजपासून दाखल करता येणार आहे. राज्यातील सर्वच ग्रामीण आणि शहरी भागातील उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून आज अधिसूचना प्रसिध्द …

Read More »

निवडणूक कामावर हजर होण्यासाठी जाणाऱ्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू आयोगाने गंभीर दखल घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीच्या कालावधीत अनेक शासकिय कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना निवडणूक कामाकरीता तात्पुरत्या स्वरूपात आयोगाच्या अखत्यारीत नियुक्ती केली जाते. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी अनेक अधिकारी-कर्मचारी कधी आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या तर कधी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना मिनतवाऱ्या करतात. परंतु निवडणूक कामासाठी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी जाताना मंत्रालयातील एका वरिष्ठ लिपिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना …

Read More »

राज्यातील राजकिय पक्षांच्या दिवाळ-दिवाळीच्या मौसमाला सुरुवात निवडणूक आचारसंहिता लागू

नवी दिल्ली -मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य विधानसभेसाठी निवडणूकांची आचारसंहिता आजपासून लागू होत असून २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी यासाठी मतदार तर २४ ऑक्टोंबरला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने सत्तेत विराजमान होणारा राजकिय पक्ष दिवाळी साजरी …

Read More »

पालघर आणि भिवंडीमध्ये होणार निकालाच्या सर्वाधिक ३५ फेऱ्या लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकांचे २३ मे रोजी निकाल येणार आहेत. राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ३५ निवडणूक मतमोजणी निकाल फेऱ्या होतील. पालघर आणि भिवंडी – गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण ३३ निवडणूक निकाल फेऱ्या तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण ३२ निवडणूक निकाल फेऱ्या …

Read More »

निवडणूक आयोग मोदींच्या दावणीला बांधलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी लोकशाहीवरचा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.परंतु देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट संदर्भातील याचिका फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हीव्हीपॅट व निवडणूक मशीन यात तफावत होण्याची …

Read More »

व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी रस्त्यावर उतरा आ. जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन

ठाणे : प्रतिनिधी व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात सुमारे २१ राजकिय पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी व्हावी, यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी …

Read More »

दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आचारसंहिता शिथिल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय निवडणूक आय़ोगाने घेतला. आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून आयोगाकडे मागणी केली होती. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध …

Read More »