Breaking News

Tag Archives: ED

ED ची अमेरिकन मिलिनियर नेविल रॉय सिंघम यांना नवी नोटीस न्युज क्लिक प्रकरणी ED कडून नोटीस जारी

न्युज क्लिक या संकेतस्थळाला परदेशातून फडींग होत असल्याच्या संशय होता. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील न्युज क्लिक या संकेतस्थळाच्या कार्यालयावर आणि संकेतस्थळाशी संबधित व्यक्तींच्या घरांवर सीबीआय ने धाडी टाकत कॉम्प्युटर, हार्ड डिस्क यासह अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या. न्युज क्लिक या संकेतस्थळाला श्रीलंकेन वंशाचे आणि आता चीनच्या शांघाईत स्थाईक झालेले नेविल रॉय …

Read More »

ईडीने जेट एअरवेजची ५३८ कोटींची मालमत्ता केली जप्त बँक फसवणूक प्रकरणी कारवाई

बँक फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बंद पडलेली विमान कंपनी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतर पाच जणांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विविध कंपन्या आणि लोकांच्या नावे १७ निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक कॅम्पसचा समावेश आहे. यापूर्वी …

Read More »

वंचितप्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी काहीच चुकीचे वागत नाहीत उध्दव ठाकरे यांच्याशी युती केल्यानंतरही मोदींचे समर्थन

एकाबाजूला वंचित बहुजन आघाडी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी एकत्र येत असल्याचे जाहिर करत नुकतीच वंचित आणि शिवसेनेने युती केली. या युतीच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे …

Read More »

भाजपाचा नवा आरोप: पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांचा हात अतुल भातखळकरांच्या आरोपापाठोपाठ भाजपा प्रदेशाध्यक्षांचीही मागणी

मुंबईतील बहुचर्चित पत्रावाला चाळप्रकरणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेत त्यांच्या चौकशी करण्याची मागणी केली. भातखळकर यांच्या मागणी पाठोपाठ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवानकुळे यांनीही अतुल भातखळकर हे अभ्यासू आमदार असल्याचे सांगत या मागणीला पाठींबा दिला. पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांची चौकशी करावी अशी मागणी …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, आम्ही घाबरत नाही… सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात

देशात सध्या भितीचे वातावरण आहे आणि या देशातील भीतीच्या वातावरणाच्या विरोधात लढण्यासाठी लोक तयार आहेत आणि ते सर्वजण पवार साहेबांकडे आशेने पाहत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात असा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीत व्यक्त केला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

नाना पटोले म्हणाले, २०१४ पासून लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही कारभार महागाई, बेरोजगारीसह जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर केंद्र सरकार फेल

लोकशाही व संविधानाच्या तत्वांवर देशात आजपर्यंत सरकारे काम करत होती परंतु २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हुकूशाही पद्धतीने काम करत आहे. २०१४ पासूनच देशात आणीबाणी सुरू असून विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी व विरोधी पक्ष फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआय, आयकर सारख्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे, असा …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मुख्य व्यवसाय ईडी, सीबीआयच्या कारवाईच्या धमक्यांना मविआ भीत नाही

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजपा नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मूख्य व्यवसाय झाला आहे परंतु लोकशाहीत हे …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप; ED, CBI, इन्कम टॅक्स या सहका-यांच्या मदतीने मविआ…. ज्या शिवसेनेचे बोट धरून राज्यात वाढले त्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव

ज्या शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात भाजपा वाढली त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवून केंद्रातील मोदी सरकार कारभार करत असून ED, CBI, इन्कम टॅक्स या सहका-यांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. या संदर्भात बोलताना …

Read More »

नाना पटोलेंचा इशारा, ईडीच्या कार्यालयांबाहेर आंदोलन करणार सोनिया गांधी व राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठीच सोनिया व राहुल यांना ईडीने नोटीस बजावली आहे. भाजपा सरकारच्या या हुकूमशाही वृत्तीचा विरोध करण्यासाठी १३ जूनला …

Read More »

आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न पाहणा-यांचा स्वप्नभंग निश्चित महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपाचे स्वप्न पूर्ण होणार नाहीः बाळासाहेब थोरात

मराठी ई-बातम्या टीम केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचे काम सुरु आहे, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रातही गेल्या दोन वर्षापासून सातत्याने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून सरकार अस्थिर करण्याचे व महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे पण आम्ही सर्वजण एकजुटीने ही …

Read More »