Breaking News

Tag Archives: covid-19

पर्वत आणायला गेल्यासारखे जाऊ नका, नाहीतर पोलिसरूपी हनुमान घेवून जातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदीआदेश जारी केले आहेत. तरीही लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी हनुमानाने जसा औषधी झाडासह पर्वत आणला तसे आणण्यासाठी बाहेर पडला तसे बाहेर पडू …

Read More »

राज्यात रूग्णांच्या संख्येत १२०, तर मृतकांच्या संख्येत ७ ने वाढ ६६ रूग्णांना घरी पाठविले, ८६८ वर बाधीत

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील नागरिकांना सातत्याने विनंती करूनही सतत रस्त्यावर गर्दी करणे, कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज दिवसभरात १२० नव्या रूग्णांचे निदान झाले असून मृतकांच्या संख्येत ७ ने वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोगाग्रस्तांची संख्या ८६८ वर पोहोचली मृतकांची संख्या ५२ …

Read More »

कम्युनिटी किचनसाठी तुरूंगातील कैद्यांनी पिकविलेला भाजीपाला अकोला कारागृहातील प्रशासनाकडून कैद्यांच्या मदतीने पुढाकार

अकोला: प्रतिनिधी कोरोना या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. या संचार बंदी काळात कर्तव्यावर असणारे आणि या संकटामुळे अडचणीत आलेल्या साऱ्यांना अन्न देण्यासाठी विविध अन्नछत्र सुरु आहेत. या अन्नछत्रांना कारागृहात बंदीजनांनी परिश्रमाने पिकवलेला भाजीपाला देण्यात येत आहे.  या व अशा विविध घटकांची सांगड घालून जिल्हा प्रशासनाने …

Read More »

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षांसाठी कुलगुरूंची समिती स्थापन विद्यापीठात टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलले. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ यासाठी कोरोना आजाराचा अंदाज घेणे आणि सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आल्याची माहिती उच्च …

Read More »

संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर कोरोना चाचण्या जलदगतीने होण्यासाठी आता जिल्हानिहाय प्रयोगशाळा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे – 1. मुंबई महानगर महापालिकेकरिता – प्रयोगशाळा-कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई. 2. ठाणे जिल्ह्याकरिता – रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा- ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. …

Read More »

डॉ.आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी हातावर पोट असणाऱ्यांना द्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी दलित, वंचित बहुजनांच्या अस्तित्वाचा लढा उभारणाऱ्या महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. तसेच हा जयंती उत्सव किमान दिड महिना तरी चालतो. त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने जमा केलेला निधी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच हातावर पोटावर असणाऱ्या कामगारांना द्या असे …

Read More »

पंतप्रधान मोदींनी मराठा महासंघाच्या या प्रश्नांची उत्तरे द्यावीत जनतेचा अपमान करत असल्याचा खेडेकर यांचा आरोप

मुंबई-चिखली: प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही राज्यघटनेने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील राज्य सरकारांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेवून जनतेचा अपमान करत असल्याचा आरोप मराठा महासंघाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांनी करत त्यांना जाहीररित्या प्रश्न विचारून याची उत्तरे …

Read More »

दोनच आव्हानं, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं सर्वांच्या सहकार्याने मात करणार असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे …

Read More »

२९ रूग्णांची वाढ, संख्या ६६४ वर पोहोचली पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, बुलढाणा, औरंगबादेत सापडले नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. आज पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद आणि बुलढाण्यात नव्याने २९ रूग्ण सापडले असून सर्वाधिक पुणे येथील आहेत. पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाण्यात ३, औरंगाबादेत २ रूग्ण नव्याने सापडले. राज्यात …

Read More »

लाईट बंद … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची ग्रामीण परिस्थितीवरील कथा

रम्या गावातला झोलर माणूस. याचे पैसे त्याचाकडून, त्याचे पैसे याच्याकडून आणि जिकडून पैसे काढता येतील तिकडून काढायचा पक्का धंदेवाईक माणूस. त्याची गुजरातची नोकरी सुटल्यावर सरळ गावाला येऊन त्याने किराणा मालाच दुकान टाकलं होतं. नेरेंद्र्भाई त्याच्यासाठी देव माणूस जणू काही याचा जन्म नरेंद्रभाईच्या जांगेतूनच झाला असावा. रम्याने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी गावापासून …

Read More »