Breaking News

Tag Archives: covid-19

वाघ, बिबटे, हरिण, काळवीटांसह वन्यप्राण्यांची काळजी घ्या वनमंत्री संजय राठोड यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील प्राणी संग्रहालयामध्ये व वन्य प्राणी बचाव केंद्रामध्ये अधिक दक्षता घेण्यात यावी व केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.  राज्यात विविध जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अखत्यारित येत …

Read More »

रात्री २ वाजता मरकजमध्ये राष्ट्रीय सल्लागार अजित डोवल काय करत होते? राज्याचे गृहमंत्री देशमुख यांचा केंद्रीय गृहमंत्री शाह यांना सवाल

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचे संकट घोंघावत असताना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे झालेल्या निझामुद्दीन मरकजमधील तब्लीगीच्या आयोजनाला परवानगी का देण्यात आली ? असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित करत याच मरकजमध्ये रात्री २ वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि तब्लीगीचे पुढारी मौलाना हे कोणती …

Read More »

मोफत तांदुळ वाटप सुरू अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त मोफत तांदूळ ३ एप्रिलपासून टप्या-टप्याने  देण्यात येत आहे. या योजनेसाठी ३ लाख ५० हजार ०८२ मे.टन तांदूळ भारतीय …

Read More »

कोरोना (तिसऱ्या टप्प्यात प्रवेश झाला) ने गुणाकार सुरु केलाय…दक्ष रहा तीन पध्दतीच्या रूग्णालयांची स्थापना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडून चार आठवडे पूर्ण झालेले आहेत. रोजचे कोरोनाग्रस्तांचे आकडे हे चिंताजनक असून या आजाराने आता गुणाकार पध्दतीने अर्थात तिसऱ्या टप्प्यात प्रवेश झाल्याचा इशारा देत दक्ष रहा, सतत मास्कचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत चीनच्या वुहान प्रांतातील सर्व निर्बध ७०-७६ दिवसानंतर उठविण्यात …

Read More »

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश ? राज्याने हजाराचा टप्पा ओलांडला रूग्ण १०१८ वर पोहोचले, सर्वाधिक पुन्हा मुंबईत

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राने आता अधइकृतरित्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्याचे स्पष्ट होत असून काल १२० नव्या रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज पुन्हा १५० रूग्णांचे निदान झाले. यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबईतील असून त्यांची संख्या ११६ आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार १८ वर पोहोचली. राज्यात दिवसभरात मुंबई ११६, पुणे-१८, …

Read More »

कोरोनाला न घाबरता मंत्र्यांनी लावली हजेरी मंत्रिपरिषदेला मंत्रालय, जिल्ह्यातून मंत्र्याची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढतच असताना या आजाराच आगामी काळात पराभूत करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी व्हिडीओ काँन्फरसिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे यातील अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यातून बैठकीला हजेरी लावली. मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

कोरोनाच्या लढ्यासाठी मंत्रालयातल्या अधिकाऱ्याची अशीही दर्यादीली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ हजाराचा वैयक्तीक सहभाग

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशावर आलेल्या कोरोना आजाराच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यादृष्टीकोनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्रालयातील कार्यासन अधिकारी विष्णू पाटील यांनी तब्बल ५१ हजार रूपयांची वैयक्तीक मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. यासंदर्भातील ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी …

Read More »

राज्यातील शालेय विद्यार्थीही करणार आता ‘लर्न फ्रॉम होम’ सर्व अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत पडताळणी करण्याचे मंत्री गायकवाड यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. …

Read More »

काँग्रेस अध्यक्षा पंतप्रधानांना म्हणाल्या, आम्ही सोबत पण हे सल्ले अंमलात आणा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षिय नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेषत: पंतप्रधानांनी काय करावे याबाबतचे पाच कलमी सल्ले देत त्याची अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोबत असल्याची …

Read More »

पगार कापून बिले आलीत, पण मुख्यमंत्रीसाहेब पोलिसांना पुर्ण पगार द्या भाजप नेते आमदार अँड. आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचे काम करणाऱ्या पोलिसांचे पगार कपात केली जाणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने जाहीरपणे दिली. तरी अद्याप पोलीसांचे पगार झालेले नाहीत. मात्र ट्रेजरीकडे आलेली पे बिल २५% कपात करुन आल्याने पगार कपात करून जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे पोलिसांना पुर्ण पगार द्या, …

Read More »