Breaking News

Tag Archives: chandrakant patil

बागेश्वर बाबासमोर नतमस्तक होत देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन म्हणजे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या देशातील भ्रष्टाचारी, दुराचारी, अनाचारी नेते भयभीत आहेत असे सांगतानाच ,काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाही असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस जर गांभीयाने घेत नसेल तर त्यांना मी का गांभीर्याने घेऊ, असा प्रतिप्रश्नही देवेंद्र फडणवीस …

Read More »

राज्यातील या तीन शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठे स्थापन करण्याची परवानगी

आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, मराठा आरक्षण प्रश्नी “टीकणारे आरक्षण देणार” ते “प्रयत्न करणार” आधी एकल शिंदे आयोगाचा निर्णय आता तीन न्यायमुर्तींची समिती निर्णय देणार

राज्यात मराठा आरक्षण प्रश्नी गावागावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राजकिय नेत्यांना गावबंदी केली. त्यातच मराठा आरक्षणाचे कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आत ६ वा दिवस असून त्यांचा आवाज अत्यंत क्षीण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …

Read More »

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर राज्य सरकार थोडेसे नरमले सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक

मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीच्या घोषणा देत २९ नोव्हेंबरपासून गावागावात सामूहिक आमरण उपोषणाचे आवाहन केले. तसेच या आमरण उपोषणाच्या कालावधीत कोणाला काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारवर राहणार असल्याचा इशारा दिला. तसेच आगामी काळात आणखी आंदोलन तीव्र करणार असल्याचे अंतिम इशारा दिला. त्यानंतर …

Read More »

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती कार्यक्रमांत समानता आणणार

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम व योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी कायमस्वरुपी समिती गठीत करण्याचा तसेच एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांकरिता लाभार्थींच्या संख्येस मान्यता देण्यात आली. राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण …

Read More »

आतापर्यंत २३ हजाराहून अधिकांना २५ कोटी रुपयांपेक्षा व्याज परतावा लाभार्थ्यांना ७ दिवसांत व्याज परतावा देण्याचे नियोजन करावे-मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून आतापर्यंत २३ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्याज परतावा देण्यात आला आहे. यापुढील काळात लाभार्थ्यानी व्याज परताव्याचा दावा केल्यानंतर सात दिवसांच्या आत व्याज परताव्याचा लाभ देण्यासाठी महामंडळांनी कालबद्ध नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण आणि …

Read More »

नॅक मूल्यांकन प्रक्रियेत “या” सुधारणा करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) अधिकाधिक मुल्यांकन करून घ्यावे यासाठी नॅक प्रक्रियेत काही सुधारणा करण्यात याव्यात, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान पुणे येथील एका …

Read More »

मंत्रालयात असून ऐनवेळी दांडी मारणाऱ्या अजित पवार यांच्याकडे अखेर पुणे तर चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर -पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

भाजपाच्या पुन्हा एकदा मोदी सरकारसाठी राज्यातील राष्ट्रवादी पक्षात फुट पाडत अजित पवार यांना शिंदे-फडणवीस सरकारने उपमुख्यमंत्री पद दिले. त्यानंतर अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे कामाचा सपाटा सुरुही करत सकाळी ९.३० वाजता किंवा त्यापूर्वी सकाळी मंत्रालयात येऊन कामे उरकण्यास सुरु केली. मात्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी नेहमीप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सकाळी मंत्रालयात हजर …

Read More »

नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा

राज्यातील उच्चशिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, मात्र अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी विद्यापींठानी पुढाकार घेऊन महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घ्यावे,असे सांगतानाच नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकन संदर्भात कुलगुरूंची …

Read More »

राज्यात १ हजार ४९९ नवी महाविद्यालये सुरु होणारः मुख्यमंत्र्यांची मान्यता नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी …

Read More »