Breaking News

Tag Archives: chandrakant patil

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. ९ सप्टेंबर २०२० ते ५ मे २०२१ दरम्यान सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) मधून आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईडब्ल्यूएस) विकल्प घेतलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत शासन सकारात्मक पाठपुरावा करेल, …

Read More »

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले. माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था …

Read More »

के. सी. महाविद्यालयात ‘जी २० युवा संसद- भारत @२०४७’ कार्यक्रम देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

भारताला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. देशाला विकसित करून आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यात तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. एच. एस. एन. सी. विद्यापीठ, मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या या १२ महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करण्याचा दर्जा मिळणार

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. यानुसार आता या अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित/सह (Joint Degree) पदवी प्रदान करता …

Read More »

जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील …

Read More »

आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार

गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये एनईपी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘एनईपी’ अंमलबजावणीसाठी अंतिम आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यात नवीन शैक्षणिक …

Read More »

मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरील मरीन ड्राईव्ह येथील शासकिय वसतिगृहात तरूणीची हत्या संशयित सुरक्षा रक्षकाने रेल्वेखाली जीव देऊन केली आत्महत्या

मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई शासकिय वसतिगृहातील अठरा वर्षीय तरुणीची हत्या करून एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री पाटील यांच्या कार्यक्रमाकडे पुणेकरांनी फिरवली पाठ फक्त काही निवडक व्यक्तीच झाले उपस्थित

राज्यातील ११ उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर कार्यक्रम आज पार पडला. तसेच नितीन गडकरी हे कार्यक्रमास ऑनलाईन सहभागी झाले होते. मात्र या कार्यक्रमाकडे पुणेकरांनी आणि भाजपा-शिंवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच चक्क पाठ फिरवली …

Read More »

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन: प्रवेशप्रक्रिया १ जून पासून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास ०१ जून २०२३ पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात …

Read More »