Breaking News

Tag Archives: chandrakant patil

चंद्रकांत पाटील यांचा सल्ला, देवेंद्र मोठ्या मनाचे उध्दव ठाकरे यांनी माफी मागितली तर… राजकारणात लवचिकता महत्वाची

भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपात येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरे ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले, तर एकत्र येता येईल,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर येण्याबाबत काही संकेत …

Read More »

भाजपा पार्टी स्थापना दिनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन, कार्यकर्त्यांनो हा संकल्प करा… लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा तयारी करा

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ …

Read More »

अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी किती निधीची तरतूद केली, माहीत आहे का? जाणून घ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. ही अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. भारताच्या प्रगतीला गती देताना शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीबरोबरच नैतिक मूल्य, संस्कृती, ज्ञान याचा योग्य समन्वय करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे. …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची घोषणा, तासिका तत्वाच्या मानधन वाढीसह हि पदे भरण्यास मान्यता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवेदनाद्वारे विधिमंडळात माहिती

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वित्त विभागाने …

Read More »

आता चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही बावनकुळेंच्या वक्तव्याची री…आमची तयारी विधानसभेसाठी २८८ तर लोकसभेच्या ४८ जागांची भाजपाकडून तयारी

राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवरील अंतिम सुनावणी कधी लागेल याबाबतचा कोणताही अंदाज स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांही अद्याप लांब असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त ४७ जागा विधानसभेच्या निवडणूकीत देणार असल्याचे सांगत २४० जागांवर भाजपाची तयारी असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. त्यावरून …

Read More »

अजित पवारांचा टोला, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे ठिक आहे, पण संसदीय मंत्री पाटलांना काय अडचण सध्या सभागृहात गलिच्छपणाचे कामकाज सुरू आहे ; निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचा नाईलाज होतो; अजित पवार सभागृहात संतापले...

सध्या सभागृहात गलिच्छपणाचे कामकाज सुरू आहे…अक्षरशः यांना कुणालाही विधीमंडळाच्या कामकाजात रस नाहीय… यांना बाकीच्याच कामात रस आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचा नाईलाज होतो अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच आज सकाळी सभागृहात मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री उपस्थित राहिले नसल्याने विरोधी पक्षनेते …

Read More »

पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होऊ न देण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय पीएमपीएमएलचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांना आदेश

पुणे देशातील सर्वात जलदगतीने विकसीत होणारे शहर आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही याची पीएमपीएमएल प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पीएमपीएमएलच्या चार ठेकेदारांकडून काही दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी शहर बससेवेबाबत पुणे व पिंपरी …

Read More »

अखेर राज्य सरकारकडून संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मरक्षक नव्हे तर ‘स्वराज्यरक्षक’ विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यांनी मानले आभार

राज्य सरकारच्यावतीने ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील बलिदान व समाधीस्थळाच्या कामाविषयी निवेदन करताना छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केला त्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे आभार मानले. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने गेल्या अर्थसंकल्पात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान व समाधीस्थळाच्या विकासासाठी …

Read More »

MPSC प्रश्नी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन अन चंद्रकांत पाटलांवर निशाणा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील मोदी बागेतील घरी झाला. त्यानंतर शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक …

Read More »

महेंद्र गायकवाड विरूध्द शिवराज राक्षे लढतीत शिवराज ठरला महाराष्ट्र केसरी मानाची गदा आणि थार गाडीचा मानकरी

पुण्यात आज शनिवार ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. या लढतीत शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला. नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने …

Read More »