Breaking News

Tag Archives: cabinet decision

शिवडी न्हावाशेवा प्रवासासाठीही मुंबईकरांना आता टोल भरावा लागणार

अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला असून सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकरिता परतीचा पास …

Read More »

शेती महामंडळाच्या जमिनीबाबत आणि मुद्रांक शुल्काबाबत मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बैठक

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जसजशी जवळजवळ येत चालली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणीची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम तारीख जसजशी जवळ जवळ येत आहे. तसतशी राज्य मंत्रिमंडळाकडून महत्वाच्या विषयावर निर्णय घेत लोकोपयोगी निर्णय घेण्यात येत असल्याचा सपाटाच विद्यमान राज्य मंत्रिमंडळाकडून …

Read More »

राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान शाळांचे मूल्यांकन करणार

शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश करण्यात आला …

Read More »

अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवून ५०० कोटी इतकी करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या ३० कोटी इतकी शासन हमी देण्यात येते. या शासन हमीचा कालावधी ८ वर्षाचा राहील. या महामंडळाकडून मुदतकर्ज तसेच डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम …

Read More »

राज्यातील या तीन शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठे स्थापन करण्याची परवानगी

आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील. …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेतले

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या कार्यकक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय राज्यातील चिटफंड न्यायलयीन प्रकरणांचा वेगाने निवाडा यासाठी कायद्यातील जून्या कायद्यातील तरतूदींचा समावेश करण्यात येणार आहेत. याशिवाय चेंबूर येथे नवबौध्द मुलां-मुलींसाठी आयटीआय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे पीएम मित्रा पार्कच्या जमिनीसाठी देण्यात …

Read More »

सूतगिरण्यांच्या कर्जाचे व्याज राज्य सरकार भरणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालविण्यासाठी पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासनाने भरण्याची योजना सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विशेष म्हणजे भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पदी असताना दिवाळखोरीत आणि तोट्यात चालणाऱ्या सूत गिरण्याच्या नव्या कर्जाला व जून्या कर्जाला कोणत्याही …

Read More »

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती कार्यक्रमांत समानता आणणार

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम व योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी कायमस्वरुपी समिती गठीत करण्याचा तसेच एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांकरिता लाभार्थींच्या संख्येस मान्यता देण्यात आली. राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांना देखील मिळणार मोफत गणवेशासोबत बूट, पायमोजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या पहिली ते आठवीत शिकणाऱ्या शालेय मुलांना देखील मोफत गणवेश देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मोफत गणवेशसोबतच दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देण्यात येतील. या निर्णयामुळे मागास व दारिद्रय रेषेखाली विद्यार्थ्यांप्रमाणेच दारिद्र्य रेषेवरील विद्यार्थ्यांना मोफत …

Read More »

कविवर्य राजा बढे यांचे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” आता राज्यगीत स्वतंत्र राज्यगीताला मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील तेरावे राज्य

कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून  अंगीकारण्यात येणार आहे.  या राज्यगीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील …

Read More »