Breaking News

Tag Archives: bjp

भाजप नावाच्या कॅन्सरला मुळापासून उघडून टाका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन

अमरावती: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. …

Read More »

भाजप-शिवसेना सरकार हे राज्यावरील सर्वात मोठे विघ्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

कळंब, यवतमाळ: प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून केंद्रातील व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी …

Read More »

अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्यांकडून भाविकांच्या पैशांवर डल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला …

Read More »

शिवसेनेला राम पावला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी

मुंबई : प्रतिनिधी मागील चार वर्षे राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले. मात्र आता निवडणूका जवळ आल्याने कदाचित शिवसेनेला खूष करण्यासाठी या उपाध्यक्षपदावर शिवसेनेच्या विजय औटी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे भविष्यात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचे दिसून येत असून शिवसेनेला राम पावला असल्याची मिश्किल …

Read More »

मराठा समाजातील ७२ टक्के नागरीकांचे उत्पन्न ५० हजारापेक्षा कमी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधिमंडळात सादर

मुंबई : प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नावरून सातत्याने मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात येत होते. तसेच राज्याच्या विधिमंडळातही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे एक आठवड्याहून अधिक दिवस कामकाजही होवू शकले नाही. अखेर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याविषयीचा कृती अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर विधान …

Read More »

अयोध्यावारीनंतर भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न चार वर्षानंतर शिवसेनेला विधान परिषदेतील उपसभापती आणि सभेत उपाध्यपदाचे गाजर

मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका नजेरसमोर ठेवत भाजपचा राम मंदीरचा मुद्दा शिवसेनेने हाती घेत भाजपला चांगलीच धोबीपछाड मारली. त्यामुळे यापेक्षा जास्तीची धोबीपछाड परवडण्यासारखी नसल्याने निवडणूकीसाठी एक वर्ष शिल्लक राहीला असताना मागील चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यपद आणि विधान परिषदेतीली उपसभापती पद शिवसेनेला देण्याचे निश्चित करत सेनेला …

Read More »

भाजपमध्ये आलेल्या २८ वाल्मिकींमुळे आमदार व त्यांच्या पत्नीचे जीवन धोक्यात भाजप आमदार अनिल गोटे यांचा स्वपक्षांवरच विधानसभेत टीका

मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढावी म्हणून गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना पक्षात प्रवेश देण्याची अत्यंत वाईट प्रथा भाजपमध्ये सुरु झाली आहे. तसेच अशा गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना वाल्मिकी बनविण्याचा चंग भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुरु केला असून अशा वाल्यांच्या वाल्मिकींमुळे माझे व माझ्या पत्नीचे जीवन धोक्यात आल्याची गंभीर बाब …

Read More »

भाजप सरकार हाय हाय… विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आमदारांची घोषणाबाजी

मुंबई: प्रतिनिधी गली-गली में शोर है…भाजप सरकार चोर है…भाजप सरकार हाय हाय…अशा घोषणा देत आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आजही मराठा आरक्षण सभागृहाच्या पटलावर ठेवा आणि दुष्काळी मदत जाहीर करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि इतर …

Read More »

अजित पवार म्हणतात दिलेला शब्द फिरविणाऱ्यातला मी नाही भाजप आमदार शेलारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी मी माझ्या जीवनात एकदा दिलेला शब्द कधीही फिरवित नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्याबाबत मी मांडलेली भूमिका कालही तीच होती आजचही तीच आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर हे आरक्षण न्यायालयात टिकणारे हवे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने काय अहवाल दिला? याची माहिती सभागृहाला मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत …

Read More »

भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे ‘ठग ऑफ महाराष्ट्र’! धनगर, मुस्लीम समाजालाही जल्लोषाची संधी का नाही? विरोधी पक्षांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी मागील ४ वर्षांपासून राज्यात केवळ ठगबाजी करणारे भाजप-शिवसेनेचे सरकार ‘ठग ऑफ महाराष्ट्र’असल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट फ्लॉप करणारी जनता आता महाराष्ट्रातील या ठगांनाही भूईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या …

Read More »