Breaking News

Tag Archives: bjp

देशात ७ तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान २३ मे ला मतमोजणी होणार असल्याची निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी विद्यमान लोकसभेचा कार्यकाल जून महिन्यात संपणार असल्याने तत्पूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता आज रविवारपासून लागू झाल्याचे जाहीर करत देशात एकूण ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणूका घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली. तसेच यंदाच्या निवडणूकीत व्हीव्हीपँट मशिन्स …

Read More »

शिवसेनेच्या आश्वासनाची सरकारकडून पूर्तता ५०० चौ.फु.पर्यंतच्या निवासी सदनिकांच्या मालमत्ता करात माफी

मुंबई :प्रतिनिधी  बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या कालावधीत पालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता राज्य सरकारकडून शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करत आगामी लोकसभा निवडणूकीच्यादृष्टीने नागरीकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यासाठी संबंधित अधिनियमामध्ये सुधारणा …

Read More »

राफेल प्रकरणी बुडत्या मोदी सरकारचा पाय अधिक खोलात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात राफेल संबंधित पुनर्विचार याचिकेवर सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांच्यावर संरक्षण खात्यातील गुप्त कागदपत्रे चोरल्याचा आरोप करून त्या कागदपत्रांचा विचार करू नये अशी विनंती न्यायालयाला केली. प्रत्यक्षात ही कागदपत्रे माहिती अधिकारातून उपलब्ध झाली आहेत असे प्रशांत भूषण यांनी …

Read More »

अधिकाऱ्यांकडून फायलींचा निपटारा करण्याच्या कामाला गती निवडणूकीची आचारसंहिता ८ मार्चला लागू होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता ८ मार्च रोजी लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात फायलींच्या निपटाऱ्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. यामध्ये विशेषत वित्त विभाग, नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील विकास कामांच्या अनुषगांने …

Read More »

भाजप-शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा - मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात येऊन आम्हाला अनेक आश्वासन दिली होती. मात्र त्यांनी मातोश्रीवर गेलेल्या शिष्टमंडळाचा अपमान केल्याचे सांगत आरोप करत उध्दव ठाकरे यांनी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप सरकारनेही आऱक्षण देण्याचे जाहीर करून अद्याप आरक्षण लागू केले नसल्याने भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना गावबंदी करून त्यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करणार …

Read More »

चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम जो बोलते है उतनाही करो भाजप खासदाराची माहीती

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि त्यांच्या खासदारांकडून जय्यत तयारी करण्यात येत असतानाच भाजपचे बरेच खासदार सध्या संभ्रमावस्थेत आणि भेदरलेल्या अवस्थेत आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, पाकिस्तानातील सर्जिकल स्ट्राईक यावरून भाजपच्या खासदारांमध्ये चलबिचल असतानाच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह हे चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम …

Read More »

माकप नेते आडम मास्तरांच्या निलंबनावर भाजपची टीका कम्युनिस्टांच्या असहिष्णुतेचे बेशरम प्रदर्शन -माधव भांडारी

मुंबई : प्रतिनिधी सोलापूर शहरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम उर्फ आडम मास्तर यांना माकपने तीन महिन्यांसाठी पार्टीच्या मध्यवर्ती समितीतून निलंबित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सभेत सहभागी होऊन त्या दोघांचीही स्तुती केल्याचा अक्षम्य अपराध केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने ही कारवाई केली आहे. माकपची …

Read More »

दिल्लीतून होणार भाजपच्या खासदारांचा प्रचार प्रत्येक राज्यातील राजकिय, जातनिहाय आणि प्रश्नांची माहिती मुख्यालयात जमा

मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. मात्र सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केल्याचे दिसून येत असून यंदाच्या निवडणूकीत संख्याबळ वाढविण्यासाठी प्रत्येक राज्यातील स्थानिक पातळीवरील खासदाराच्या प्रचारासाठी दिल्लीतून यंत्रणा हालविण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सद्यपरिस्थितीत प्रत्येक राज्यातील भाजपची मूळ असलेली …

Read More »

शरद पवारांना नक्षलवाद्यांचा पुळका का ? भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशाची घटना आणि संसदीय लोकशाही नाकारणाऱ्या नक्षलवाद्यांचा पुळका का आला ?, की आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महागठबंधनचा धुव्वा उडणार असल्याच्या भीतीने पवारांनी आता ही वेगळी वाट स्वीकारली का? असा सवाल भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. शरद पवार यांनी पुण्यात …

Read More »

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून द्या आयोगाने घेतला निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा

मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने राज्यातील निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा आज भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी आज येथे घेतला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कालपासून निवडणूक आयुक्त लवासा आणि चंद्रा राज्यातील यंत्रणांशी बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहेत. उप निवडणूक आयुक्त  सुदीप …

Read More »