Breaking News

Tag Archives: bjp

राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजाराची मदत जाहीर बागायतदारांना १८ हजार रूपयांची मदत

मुंबईः प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी वाऱ्यावर असल्याची टीका सर्वच पक्षांकडून होवू लागली. याची गंभीर दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून हेक्टरी ८ हजाराची तर बागातयतदारांना १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी किमान २ हेक्टर …

Read More »

राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जनतेला सत्य कळलं आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी राहुल गांधींनी नरेंद्र मोदीजींची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची जाहीर माफी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत चौकशीचे दिले आदेश काँग्रेस नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा माहिती

मुंबई: प्रतिनिधी राफेल प्रकरणात यशवंत सिन्हा, प्रशांत भूषण आणि अरुण शौरी या नेत्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली असून त्यासंदर्भात पूर्ण निकालाचे वाचन न करता मोदी सरकारला पुन्हा एकदा क्लीन चीट दिल्याचे चित्र उभा केले जात आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तपशिलात जाऊन वाचन केल्यास मोदी …

Read More »

सर्वाधिक जागा आणि मते भाजपाला तर दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत सर्वात जास्त अर्थात १ कोटी ४२ लाख मते भाजपाला मिळाली आहेत. तर सर्वात जास्त १०५ आमदार निवडूण आले असून १४ अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला असल्याने ११९ आमदारांच्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होवू शकत नसल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच राज्यात भाजपानंतर सर्वात …

Read More »

अखेर अरविंद सावंतांच्या रूपाने शिवसेना एनडीएतून बाहेर भाजपाआधीच शिवसेनेकडून युती तुटल्याची अधिकृत घोषणा

नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यामुळे एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून मोदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आज राजीनामा दिला. विशेष म्हणजे भाजपाने युतीसंदर्भात भूमिका जाहीर करण्यासाठी शिवसेनेला संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतची …

Read More »

भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय संध्याकाळी ७.३० नंतर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून १७ दिवस झाले. तसेच राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला कौल दिलेला असतानाही शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरु ठेवल्याने याबाबतचा निर्णय राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीनंतर अर्थात संध्याकाळी ७.३० वाजल्यानंतर युतीबाबतचा निर्णय भाजपा घेणार असल्याची माहिती माजी अर्थमंत्री सुधीर …

Read More »

देवेंद्र म्हणाले माझी अडचण होईल…अमित शाह आणि कंपनीवर विश्वास नाही मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठाम

मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीसाठी युती करताना अमित शाह यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे आताच जाहीर करू नका नाहीतर माझी पक्षात अडचण होईल अशी विनंती केली. आता ते मुख्यमंत्री पदाबाबत अशी चर्चा झालीच नसल्याचे सांगत मला खोट ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे प्रतित्तुर भाजपा नेते …

Read More »

अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची चर्चा कधी झालीच नव्हती शिवसेनेची भाजपाऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरु असल्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील निवडणूकांचे निकाल जाहीर होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेत सरकार स्थापनेसाठी सर्व मार्ग खुले असल्याचे जाहीर केले. त्याचा सर्वात मोठा धक्का आम्हाला बसला. त्यांना अनेकवेळा मी स्वतः फोन केला. पण त्यांनी तो स्विकारला नाही. तसेच अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत माझ्यासमोर चर्चा झालीच …

Read More »

अखेर पदाचा राजीनामा….पण पुढचे सरकार भाजपाच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. परंतु निवडणूकीला महायुती म्हणून सामोरे जावूनही शिवसेनेने चर्चेची दारे बंद केली. त्यामुळे कठीण परिस्थिती असतानाही राज्य सरकार स्थापन करता आले नसल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत कार्यकाल संपत आल्याने राजीनामा राज्यपालांना सादर केला आहे. राज्यात नव्या निवडणूका होणे …

Read More »

जर भाजपा शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम शिवसेना पक्षप्रमुख उध्द ठाकरे यांचे वक्तव्य

मुंबईः प्रतिनिधी युती मला तोडायची नाही. तसेच ती तुटावी म्हणून कोणतेही पाऊल उचलणार नाही. परंतु भाजपा जर दिलेला शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगत एकप्रकारे मुख्यमंत्री शिवसेनेचाच यावर आज शिक्कामोर्तब केले. वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी शिवसेना आमदारांच्या बोलाविलेल्या बैठकीत ते …

Read More »