Breaking News

Tag Archives: bjp

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, … सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का?

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण

राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बोलविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात शिक्षण व नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे एकाच गावात नांदणारे मराठा व ओबीसी बांधव यापुढेही गुण्यागोविंदाने नांदतील व …

Read More »

मराठा समाजाला आरक्षण; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून एकमताने संमत करण्याचा राज्यातील महायुती सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, चंदिगढ महापौर निवडणूकीतील बॅलेट पेपर दाखवा

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची मते अधिक असतानाही चंदिगढ महापौर निवडणूकीत अल्पमतात असणाऱ्या भाजपाचा उमेदवार विजयी झाला अशी घोषणा निवडणूक आयोगाने जाहिर केली. मात्र त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच निवडणूक आयोगाचा एक अधिकारी मतदानासाठी वापरण्यात आलेल्या बॅलेट पेपरवर स्वतःच शिक्के मारत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही नाही म्हणणार नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करत जयंत पाटील यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या …

Read More »

जयंत पाटील एकाच वाक्याच उत्तर, मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही संपर्क केला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील अशा बातम्या अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र जयंत पाटील यांनी आज मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत या बातम्यांची हवाच काढली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत म्हणाले की, मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा उपरोधिक सवाल, आता त्यांना आमचे लोकही हवे आहेत….

भाजपाकडे ऐवढी ताकद असताना सुद्धा आमच्याकडचे लोक हवेसे वाटत असतील तर, काही तरी दम आहे ना, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी कांदा निर्याती सारख्या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेवर कारवाईची धमक महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही का?

कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे, हातपाय तोडू, डोळे काढू, अशी भाषा करतो, चिथावणीखोर भाषण देतो, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे, पोलीस आपले काहीच वाकडं करु शकत …

Read More »

जितेंद्र आव्हाडांचा आरोप,…लोकांच्या पैशातून भाजपा आणि मोदींचा निवडणूक प्रचार

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठमोठ्या घोषणा करत भाजपाला तिसऱ्यांदा संधी देण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांसमोर करत देशाच्या विकासासाठी, गरिब जनतेला मोफत अन्न मिळण्यासाठी आणि देशाला पहिल्या तीन विकसित राष्ट्राच्या यादीत बसविण्यासाठी भाजपाला तिसऱ्यांदा संधी हवी असल्याची मागणी केली. तसेच यावेळी एकट्या भाजपाला ३७० जागा मिळवाव्याच लागतील असेही स्पष्ट केले. देशातील …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, बहुसंख्य हिंदू तर धार्मिक राजकारण कशासाठी?

राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनेही आता मराठवाडा, विदर्भात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका आणि सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच आज वर्धा येथील वंचितच्या जाहिर सभेसाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी संध्याकाळी सभेत पक्षाची भूमिका मांडण्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर …

Read More »