Breaking News

Tag Archives: bhima

नागरिकांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र बंदला शांततेत सुरुवात दलित कार्यकर्त्यांकडून वाहन चालक आणि नागरीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला राज्यातील बहुतांष ठिकाणी स्थानिक नागरिकांनी ओ देत दैनंदिन कामकाजावर थांबविण्यास सुरुवात केली आहे. या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, विरार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अनेक शाळा आणि एस.टी,बसेस बंद ठेवण्यात …

Read More »

भीमा कोरेगांवप्रकरणी मुंबईत दलित समाजाकडून शांततेत रास्ता रोको उद्या बुधवारी महाराष्ट्र बंद

मुंबईः प्रतिनिधी दलित समाजावर भीमा कोरेगांव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ मुंबईतील विविध ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आणि निदर्शने करत शांततेत बंद पार पाडला. काही ठिकाणी तुरळक वाहनांवर दगडफेकीच्या घटनांचा अपवाद वगळता मुंबईतील बहुतांष भागात बंद शांततेत पार पडला. सकाळीच दलित समाजाचे कार्यकर्त्ये मोठ्या संख्यने रस्त्यांवर येत दुकाने बंद करण्याचे …

Read More »

भीमा कोरेगांवप्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे मंत्रालयात आंदोलन १८ आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अटक

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांवसह चार गांवामध्ये झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे मंत्रालयाचा संपूर्ण परिसर दणाणून गेल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे साधारणतः १८ कार्यकर्त्ये मंत्रालयात आले. त्यानंतर त्यांनी थेट …

Read More »

समाजविघातक शक्तींचा कुटील राजकीय डाव हाणून पाडा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी भिमा कोरेगांव, वढू बु. सणसवाडी आणि शिक्रापूर येथे मानवंदना देण्यासाठी जमलेल्या दलित बांधवांसोबत झालेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

भीमा कोरेगांव घटनेचे मुंबईसह राज्यभरात पडसाद शरद पवारांसह मुख्यमंत्री आणि संभाजी ब्रिगेडकडून शांतता राखण्याचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांव, वढू बु. आणि शिक्रापूर सह चार गावात अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करत दंगल घडविली. या घटनेचे पडसाद राज्यातील मुंबईसह औरंगाबाद, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला येथे उमटले असून दलित कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आणि बंदची हाक दिली. भीमा कोरेगांव येथे दगडफेकीच्या …

Read More »

भीमा कोरेगांवबाबत मुख्यमंत्र्यांचा तात्काळ आदेश नाही म्हणून कारवाई नाही पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक यासह अन्य दोन गावांच्या परिसरात समाजकंटकांनी घातलेल्या हैदोसानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना पुढील कारवाई काय करता येईल याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी कोणतेच तात्काळ आदेश दिले नसल्याने समाजकंटकांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहीती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पेशवाईच्या पाडावाला २०० …

Read More »

भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक येथे तणाव कायम पोलिसांचे संख्याबळ अपुरे

पुणेः प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात येत असलेली दगडफेक अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे या ठिकाणी गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून जवळपास ४० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी १ जानेवारीला …

Read More »

भीमा कोरेगांव येथे समाजकंटकाकडून दलितांवर दगडफेक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त; परिस्थिती तणावपूर्ण

पुणेः प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी जमलेल्या दलित समुदायांवर सकाळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात थोरल्या बाजीरावांनंतरचा पेशवाईचा काळ हा काळा इतिहास म्हणून ओळखला जातो. त्यावेळच्या प्रथा, परंपरांच्या विरोधात …

Read More »