Breaking News

Tag Archives: anil deshmukh

‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला …

Read More »

परिस्थिती पाहूनच १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन टप्याटप्याने शिथिल करा मुख्यमंत्र्यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पंतप्रधानांची सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्व राज्यांनी लॉकडाऊन केले. तर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल २०२० रोजी संपत असली तरी त्या त्या राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन एकदम न उठवता ती टप्याटप्याने शिथिल करावी अशी सूचना करत राज्यातीळ स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे …

Read More »

पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची …

Read More »

फक्त मालवाहू ट्रक चालणार खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी  देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून न अडविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री …

Read More »

दिशा कायदा विशेष अधिवेशनात मांडणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या समस्येमुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे शक्य न झाल्याने त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. यासंदर्भात निवेदन करताना गृहमंत्री देशमुख म्हणाले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सुरक्षा सक्षमीकरणाच्या हेतूने नवीन …

Read More »

चाईल्ड पॉर्नग्राफीतील गुन्ह्यात महाराष्ट्र देशात प्रथम १२५ गुन्हे दाखल केल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात बाल लैगिंक अत्याचार कायद्याखाली आणि चाईल्ड पॉर्नग्राफी प्रकरणी आतापर्यंत १२५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ४० जणांना अटक करण्यात आलेली असून याप्रकरणी देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत अॅड.आशिष शेलार, पराग अळवणी, प्रशांत ठाकूर, अमित साटम यांच्यासह अन्य …

Read More »

अबु आझमी म्हणाले, एक महिना द्या सगळं बंद करून दाखवतो राज्य सरकारला आव्हान मादक द्रव्ये बंद करा अन्यथा

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबईतील अनेक भागात नशेली पदार्थ मिळत आहेत. अशा पध्दतीच्या पदार्थांची विक्री बंद करणे राज्य सरकारच्या हातून होणार नसेल तर माझ्या हातात द्या एक महिन्यात अशा गोष्टी बंद करून दाखवतो असे आव्हान समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी राज्य सरकारला दिले. या आव्हानाची तात्काळ दखल घेत विधानसभाध्यक्ष पटोले …

Read More »

महाराष्ट्रातही बलात्कार, लैगिंक छळ आदींच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशनातच नवा कायदा मांडणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत हा कायदा बनविण्यासाठी विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार असून या कायद्याअंतर्गत बलात्कार, सामुहिक बलात्कार, अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. विधान …

Read More »

सावरकर गौरव प्रस्तावावरून विरोधकांचा गोंधळ कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभेत विरोधकांकडून प्रतिविधानसभा

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभेत आज  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी सावरकर यांच्या गौरवपर प्रस्ताव सभागृहाने संमत करावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावास ज्येष्ठ भाजप चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दिले. अध्यक्ष नाना पटोले यांनी अनुमती नाकारताच मी सावरकर अशा भगव्या टोप्या घातलेले  …

Read More »

विरोधकांचे वय ६ ते १८ असेल तर मोफत चष्मे वाटू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विरोधकांना प्रतित्तुर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आणि चांगल्या पध्दतीने काम करत आहे. मात्र विरोधकांना चांगली कामे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे वय ६ ते १८ वयोगटातील असेल तर शालेय मुलांना ज्याप्रमाणे मोफत चष्मे वाटले तसे त्यांनाही मोफत चष्मे वाटू अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या …

Read More »