Breaking News

Tag Archives: anil deshmukh

सरकारी खरेदी केंद्रांवर परराज्यातून धान आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रांवर परराज्यातलं धान विक्रीसाठी येऊ नये, त्यातून राज्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणासारख्या परराज्यांच्या सीमांवरील नाक्यांवर कडक तपासणी मोहिम राबवावी. परराज्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून राज्यातील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल …

Read More »

भाजप, रासपाच्या कार्यकर्त्याबरोबर भिवंडीतील या नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला सोहळा

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, …

Read More »

खबरदार! महिला व बालकांवर अत्याचार कराल तर थेट फाशीवर लटकाल अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिक्षा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा आगामी अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात येणार असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करून १५ दिवसात तपास करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. …

Read More »

मराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध सामाजिक आणि राजकिय प्रश्नी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर डिसेंबर २०१९ पर्यंत तत्कालीन सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कोर्टाच्या आणि पोलिसी तुरुंगात अडकलेल्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. कोरेगांव भीमा येथे झालेल्या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. त्यामुळे सलग राज्यातील काही …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले पोलिसांना हे वचन २६/११ ही काळजावरची जखम असल्याने पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध

मुंबई : प्रतिनिधी सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य …

Read More »

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभुमीवर गर्दी नको, घरातूनच अभिवादन करा अभिवादन, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण; ऑन-लाईन माध्यमातून दर्शन

मुंबई : प्रतिनिधी महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून …

Read More »

पोलिसांच्या ‘फोर्स वन’ ला या तीन पध्दतीने प्रोत्साहन भत्ता मिळणार त्यांच्या आयुष्याची काळजी घेऊ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘फोर्स वन’ मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य …

Read More »

दिल्लीबरोबरील संघर्षात राज्याची स्वायतत्ता टिकविण्यासाठी ठाकरे सरकारने काढले हे आदेश सी.बी.आय. चौकशीसाठी आता राज्य सरकारची पूर्व संमती घेणे आवश्यक- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस आणि राज्याची स्वायतत्ता राखण्यासाठी ठाकरे सरकारने १९८९ साली केंद्राला दिलेली परवानगी आदेश रद्द करत आता राज्यातील कोणत्याही गुन्हे अथवा प्रकरणात चौकशी करायचे असेल राज्य सरकारची परवानगी घेणे सीबीआयला बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे आता सी.बी.आय.चौकशीसाठी राज्य सरकारची पूर्व संमती घेणे आवश्यक असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी …

Read More »

राज्यात एकाचवेळी १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती …

Read More »

ड्रग रँकेटमध्ये जे अडकले त्यांच्यावर कारवाई होणारच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले स्पष्ट

मुंबई : प्रतिनिधी “बॉलीवुडमधल्या काही जणांचा ड्रग रँकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण या काहीजणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवुड ड्रग रँकेटमध्ये अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवुडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल,” …

Read More »