Breaking News

चाईल्ड पॉर्नग्राफीतील गुन्ह्यात महाराष्ट्र देशात प्रथम १२५ गुन्हे दाखल केल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यात बाल लैगिंक अत्याचार कायद्याखाली आणि चाईल्ड पॉर्नग्राफी प्रकरणी आतापर्यंत १२५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ४० जणांना अटक करण्यात आलेली असून याप्रकरणी देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत अॅड.आशिष शेलार, पराग अळवणी, प्रशांत ठाकूर, अमित साटम यांच्यासह अन्य सदस्यांनी याबाबतचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.

संकेतस्थळांवर लैगिंक अत्याचाराचे चाईल्ड पॉर्नग्राफी असलेले व्हीडीओ अपलोड करण्यात आले. आतापर्यंत सायबर क्राईमच्या माध्यमातून १६०० प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी १२५ जणांवर गुन्हे दाखल ४० जणांना अटक करण्यात आले आहे. यासंदर्भात द नॅशनल सेंट्र फॉर मिसींग अॅण्ड एक्सप्लोयटेड चिल्ड्रन ही आंतरराष्ट्रीय स्वंयसेवी संस्था काम करत आहे. या संस्थेने केंद्राच्या द नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो संस्थेकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात उपलब्ध झालेली माहिती मुंबईसह १० आयुक्तालये व २९ जिल्हा घटक प्रमुखांकडे बळी पडलेल्या मुलांच्या पुर्नवसनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार  असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *