Breaking News

Tag Archives: शेतकरी

नाना पटोले यांचा आरोप, कृषीकर्ज व बियाणांसंदर्भात राज्य सरकारकडून चुकीची माहिती कृषी मंत्र्यांच्या नावाने वसुली करणाऱ्यांवर काय कारवाई केली?

राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर देत असून …

Read More »

बियाणे-खते-खरीप पीक कर्जप्रश्नावरून काँग्रेसने मंत्री मुंडे यांना घेरत केला सभात्याग अखेर अर्थमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत दिले उत्तर

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास पुकारण्यात आला. यावेळी राज्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतांच्या किंमतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करण्यात येत असल्याची प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस सदस्यांच्या प्रश्नासमोर मंत्री धनंजय मुंडे यांना …

Read More »

महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक १४२० कोटी रुपयांचा निधी वितरित निधीसाठी मार्गदर्शक तत्वे शिथिल, तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

राज्यातील अतिवृष्टी, ओला दुष्काळ तसेच पावसाळ्यातील नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने आज देशातील २२ राज्यांना आपत्ती निवारणासाठी ७ हजार ५३२ कोटी रुपयांचा निधी वितरित केला. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा निधी अर्थ मंत्रालयाकडून वितरित करण्यात आला आहे. या यादीत उत्तर प्रदेश राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून ८१२ कोटी रुपये, तर ओडिशा …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले हे निर्देश शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको

नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. आज सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ठाकरे यांनी वर्षा …

Read More »

पाऊस तर आला पण पेरणी कधी करायची? कृषी आयुक्तांनी दिला शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला राज्यात बियाणे, खतांचा मुबलक साठा पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी- कृषी आयुक्त सुनील चव्हाण

खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात २०.६० लाख हेक्टर म्हणजे १४ टक्के पेरणी झाली आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. यंदाच्या खरीप हंगामाकरिता …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपाचा कुटील डाव

महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यासंदर्भात पत्रकारांशी …

Read More »

शरद पवार यांचा टोला, …कुठे जायचे तेथे जावे पण अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा

मणिपूर येथे मागील ४५ दिवस सतत दंगली होत आहेत. केंद्र सरकार ज्याप्रमाणे मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांना पाहत आहे त्यातून तिथल्या लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्याने आम्ही या देशाचे नागरिक आहोत का? असा प्रश्न पत्राद्वारे केला. लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना असे वाटत असेल तर सामान्य माणसाची अवस्था काय असेल? देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जायचे तिथे जावे, …

Read More »

राज्यातील शेतकरी वर्गाच्या पशुधनासाठी पदुम विभागाने घेतले हे महत्वाचे निर्णयः जाणून घ्या

पशुधन हिताय, बहुजन सुखाय ब्रीद’ जपत शेतकरी, पशुपालकांसाठी काम करणारे हे शासन आहे. पशुधन’ हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पशुधन वाढले पाहिजे, जोपासले पाहिजे, यासाठी या विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, …तर होणारी GST लूट थांबवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण

केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार …

Read More »

राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी …

Read More »