Breaking News

Tag Archives: शेतकरी

कर्ज वसुली करिता शेतकऱ्यांना पाठवण्यात येणारी बँकेची नोटीस तत्काळ थांबवा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

राज्यात सरासरीपेक्षा यंदा पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुली करिता नोटीस बजावण्यात येत आहे. मात्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मूग गिळून गप्प का बसलं आहे असा संतप्त सवाल महेश तपासे मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आज राज्य शासनाला विचारला. पुढे बोलताना महेश …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, नाफेडच्या दरातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? कांद्याचे ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरुच राहील

शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि सरकार आता नाफेड मार्फत केवळ २ लाख टन कांदा २४१० रुपयाने खरेदी करणार आहे. या भावात कांद्याचा …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, नाफेडमार्फत २ लाख टन कांदा खरेदीचा निर्णय? केवळ धुळफेक मुख्यमंत्री बैठका घातायेत आणि उपमुख्यमंत्री जपानमधून निर्णयाची घोषणा करतात, सरकार नेमके कोण चालवतंय ?

केंद्र सरकारने अचानक कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार बंद पाडले. शेतकऱ्यांचा संताप पाहून राज्यातील तिघाडी सरकारने धावाधाव करत नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यातील बाजारात मागील महिन्यात ११ लाख टन कांदा आला व या महिन्यात आतापर्यंत ६.५ लाख टन कांदा आला आहे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार… अडचणीत असलेल्या प्रत्येकाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहणार

मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कमी पावसामुळे कांद्याचे दर वाढून त्याचा फटका सरकारला बसू नये म्हणून या उद्देशाने कांदा निर्यातीवर सरसकट ४० टक्क्याचा कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील विविध शेतकऱ्यांच्या संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु केले. यापार्श्वभूमीवर राज्य …

Read More »

या शेतकऱ्यांना जाहिर झाला वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- कृषीमंत्री धनंजय मुंडे

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुसद येथे आयोजित करण्यात आलेल्या वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात केले. पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात कृषीमंत्री …

Read More »

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार-कृषी मंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा …

Read More »

महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता एका क्लिकद्वारे जमा

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे असे एकूण १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील सव्वा लाख ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील, असा विश्वास …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, …शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही

राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचा सर्वेही केलेला नाही. सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने …

Read More »

कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर! गोगलगायी नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्याच्या सूचना

मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन व कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या आधारे आज मी स्वतः परळी तालुक्यातील काही गावांमध्ये पाहणी केली असता गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वास्तव आहे. …

Read More »

धनंजय मुंडे यांची घोषणा; शेतकऱ्यांसाठी डॅशबोर्ड तयार करणार, जोड खतप्रकरणी चौकशी आता व्हॉट्सअॅपवर तक्रार दाखल करता येणार

राज्यातील शेतकऱ्यांना सध्या जोड खतांची खरेदी करावी लागत आहे. मात्र यातील खतांची ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय दुसरे घेता येत नाही. त्यामुळे या जोड खतांमागे व्यापारी, दुकानदार यांचे काही लागेबांधे आहेत असा सवाल करत खत विक्रेत्यांवर कारवाई कऱण्याची मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी …

Read More »