Breaking News

Tag Archives: राष्ट्रीय स्वंयसेवक संघ प्रमुख

प्रकाश आंबेडकर यांचा मोदींना इशारा, आम्ही १५० च्या वर जाऊ देणार नाही

राजकीय दृष्टिकोनातून आज आपण पाहिलं की, जो ओबीसी, धनगर, साळी, माळी, लोहार, सोनार इत्यादी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे जागृत झाला. त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली. आज तो स्वतःच्या अधिकारांची सुरक्षा करायला निघाला आहे. म्हणून महाविकास आघाडीला सांगितलं की, जर आपली युती झाली, तर त्यामध्ये किमान १५ उमेदवार हे ओबीसींचे …

Read More »

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. भारत जोडो अभियानातर्फे आयोजित जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दाराआड झालेल्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी ही माहिती दिली. १४ जानेवारी रोजी मणिपूर येथून निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्यासाठी ते त्यांना आमंत्रित करत होते. प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नांना …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, डॉ मोहन भागवतजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आरक्षण कधी देणार? मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सचिन सावंत यांचा सवाल

ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत व भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरुच रहायला हवे, संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे विधान दिशाभूल करणारे व फसवे आहे. मुळात संघ हा आरक्षण विरोधी आहे. संविधानाने दिलेले आरक्षण संपवण्याची भाषा संघाकडून सातत्याने केली जाते. …

Read More »

मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, मणिपूरमधील हिंसाचाराला राष्ट्रीय स्वंयसेवक संघ…. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि केंद्र सरकारचे मौन यातच सगळे आले

मागील दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर धुमसत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट देण्याऐवजी अमेरिका, फ्रांस आणि मुस्लिम राष्ट्राच्या दौऱ्यावर गेले. मात्र मणिपूरबद्दल चकार शब्द काढला नाही. त्यातच संसदेच्या पावसाळी अधिवेशाच्या तोंडावर मणिपूर येथील दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून भारतासह विदेशातून मोदी सरकारवर …

Read More »

मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाची ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची माहिती

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशी…. समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का?

वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असा खोचक टोला काँग्रेस …

Read More »