Breaking News

Tag Archives: छत्रपती संभाजी नगर

राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार महिलांचा सहभाग

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, रूग्णालयातील मृत्यू ही सरकारी हत्याच, ३०२ चे गुन्हे दाखल करा भाजपाप्रणित सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे

ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे …

Read More »

छत्रपती संभाजी नगर, लातूरमध्ये शासकीय दरात उपचार पण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

छत्रपती संभाजी नगर आणि लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालयाचे परिचालन आणि व्यवस्थापन शासन आणि खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. याद्वारे रूग्णांना शासकीय दरामध्ये उपचार मिळणार आहेत. यासाठी रूग्णालयामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण …

Read More »

अंगणवाड्यापाठोपाठ आता राज्यातील शाळा दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील लहानमुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या अंगणवाड्या खाजगी स्वंयसेवी संस्थाना दत्तक स्वरूपात देण्यात आल्यानंतर आता राज्यातील शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत रकमेच्या स्वरुपात देणगी देता अथवा स्वीकारता येणार नाही. कॉर्पोरेट ऑफिसेसना …

Read More »

मराठवाड्यातील शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरमध्ये सर्वाधिक वसतिगृहे जळकोट, अहमदपूर येथील शासकीय वसतिगृहे ; लामजना येथील निवासी शाळेच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

शासन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सामाजिक न्याय विभागाकडून लातूर जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जळकोट आणि अहमदपूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या, तसेच लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या इमारतीचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. …

Read More »

मुख्यंमंत्री शिंदे यांची घोषणा, मराठवाड्यासाठी ४६ हजार कोटींच्या या विविध विकास योजना मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प

मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल ४६ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित रक्कमेचा समावेश नाही. या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य ३०० वर्षे जुन्या पुलाच्या कामासाठी निधी देणार

मराठवाड्याच्या विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून छत्रपती संभाजी नगरची ओळख आहे. या शहरासह मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला आहे. मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शहरातील वंदे मातरम सभागृहात “मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व …

Read More »

छत्रपती संभाजी नगर नव्हे तर आता औरंगाबादच, उच्च न्यायालयाचा आदेश जिल्हाधिकाऱ्याकडूनही आदेश जारी

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर सर्वत्र संभाजीनगर उल्लेख होत आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्ह्याचा उल्लेख आधीप्रमाणे औरंगाबादच करण्याचे निर्देश दिले. यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तसे आदेशही दिले. मात्र, जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगरच होत असल्याने आता इनामदार सय्यद …

Read More »