Breaking News

विशेष बातमी

सोनियां गांधीच्या नेतृत्वावरून प्रदेश काँग्रेसमध्ये दोन गट बाळासाहेब थोरातांचे राहुल गांधींना साकडे तर गायकवाड आणि देशमुख यांचे सोनियां गांधीना

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशात भाजपाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काँग्रेसकडून म्हणावे तितके प्रयत्न होत नाहीत. त्यातच पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर मर्यादा येत असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नुकतीच पक्षातील नेत्यांनी एका पत्राद्वारे केली. मात्र राज्यातील प्रदेश काँग्रेसमध्ये सोनिया गांधीनी कि राहुल गांधी यांनी नेतृत्व …

Read More »

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खुलासा फसवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक झाल्यानंतरही दावा दाखल करता येतो

पुणे-मुंबई: प्रतिनिधी पुणे येथील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात संचालक आणि निश्चित करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती लपविली. त्याच्या चौकशीचे आदेश पुणे जिल्हा दंडाधिकारी (जेएमएफसी) ने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त प्रसारीत होताच पाटील यांनी अशा प्रकरणात उच्च न्यायालयात …

Read More »

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची निवडणूक आयोगाला खोटी माहिती: न्यायालयाचे चौकशीचे आदेश राजकिय अडचणीत वाढ होणार

पुणे- मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे महसूल मंत्री म्हणून काम केलेले आणि भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी निवडणूकीसाठी असलेल्या शपथपत्रात खरी माहिती लपवून खोटी माहिती दिली. तसेच स्वत:च्या उत्पन्नाचे स्त्रोत लपविल्याप्रकरणी कोथरूड येथील रहिवासी डॉ.अभिषेक हरिदास यांनी यासंदर्भात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने चौकशी करून १६ …

Read More »

फडणवीस सरकारने मंजूर केलेले महसुल विभागातील कारकून बनले आता “महसूल सहाय्यक” राज्य सरकारकडून पदनाम बदलीसंदर्भात आदेश जारी

मुंबई : विशेष प्रतिनिधी सरकारमधील प्रशासनात नेहमीच महत्वाची भूमिका बजाविणारी कारकून जमात ही नेहमीच महत्वपूर्ण मानली जाते. तसेच या जमातीशिवाय दस्तुरखुद्द सरकार आणि जनतेचे पान हालत नाही. सरकारी भाषेत या कारकूनाला लिपिक हा शब्द वापरण्यात येतो. मात्र आता महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या या जमातीला कारकून अर्थात लिपिक शब्द आवडेनासा झाला …

Read More »

उस्मानाबादलाही आता स्वतंत्र विद्यापीठ ? समिती स्थापनेचे आदेश उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत- उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून  सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते. …

Read More »

अनुसूचित जाती-जमातीच्या शासकिय कर्मचाऱ्यांची माहिती २ दिवसात सादर करा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभागांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना देण्यात येत असलेल्या पदोन्नती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्याची पुढील सुणावनी लवकरच होणार असल्याने सध्या शासकिय विभागात कार्यरत असलेल्या या दोन्ही प्रवर्गासाठीची मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती दोन दिवसात अर्थात २० ऑगस्ट पर्यत सामान्य प्रशासन …

Read More »

पार्थ, सध्या जे काम करतोयस तेच कर राजकारणातल्या संधीच बघू पवार कुटुंबियाकडून पार्थची समजूत

बारामती-मुंबई : विशेष प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता स्व.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी केल्यानंतर यासंदर्भात त्यांचे आजोबा शरद पवार यांनी पार्थला जाहीररित्या फटकारले. त्यामुळे पवार कुटुंबियामध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चेला उधाण आले. त्यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

राजशिष्टाचार मंत्र्यांकडूनच शिष्टाचाराचे उल्लंघन पद्म पुरस्कारासाठी नावे सुचविण्यासाठीच्या समितीचे आदित्य ठाकरे बनले अध्यक्ष

मुंबई: विशेष प्रतिनिधी लोकशाहीप्रणालीत लिखित कायद्यांबरोबरच लोकाशाही मुल्यांना अर्थात संकेताना फार महत्व असते. त्यामुळे कोणत्याही समितीची स्थापना करताना किंवा त्याच्या अध्यक्षाची नियुक्ती करताना अनुभवी आणि तज्ञ असलेल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीची निवड केली जाते. मात्र राज्य सरकारने पद्म पुरस्कारासाठी नावे सुचविण्यासाठी एका समितीची स्थापना राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. मात्र …

Read More »

पंतप्रधान किसान योजनेतही बोगस शेतकरी एका सुजाण मुंबईकरांमुळे यावर प्रकाशझोत

मुंबई: राजू झनके तेलंगना राज्याच्या धर्तीवर देशातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारकडून आर्थिक मदत देण्यासाठी वर्षाला ६ हजार रूपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी जाहीर केली. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निधीत भ्रष्टाचार होवू नये यासाठी ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्याची घोषणा केली. मात्र पंतप्रधान किसान सन्मान निधई योजनेतील …

Read More »

अंदमान व निकोबार बेटांवर दूरसंचार सेवा गतिमान करण्यात या मराठी भूमीपुत्राचे योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

नवी दिल्ली : प्रतिनिधी भारताच्या पूर्व भागाला असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली. सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.  हा प्रकल्प युनिव्हर्सल …

Read More »