Breaking News

सायबर गुन्हे पासून स्वतःला वाचविण्यासाठी आता @CyberDost गृह मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर मिळत राहणार माहिती

मुंबई : प्रतिनिधी
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात देण्यात येत आहे. नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.
आधुनिक तंत्रज्ञान वाढत असतानाच देशात सायबर गुन्हेही वाढत आहेत. लोकांमध्ये या विषयी माहिती नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती होणेही महत्त्वाचे आहे. बँकेचा युजर आयडी, एटीएम/डेबीट कार्डचा क्रमांक व पीन, पासवर्ड, ओटीपी कोणाही व्यक्तिला देऊ नये, असे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.
तसेच सायबर गुन्हे कसे घडतात, त्यांची कार्यपद्धती कशी आहे. त्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याबद्दलची माहिती देण्यासाठी गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या ट्विटर हँडलवरून नागरिकांना आवश्यक ती माहिती मिळत असून त्यातून नागरिकांच्या माहितीत भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे या ट्विटर हँडलला भेट द्यावी व त्याला फॉलो करावे, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.

Check Also

५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *