Breaking News

मुंबईतील स्मशानभूमींना सवलतीच्या दरात पाईप गॅस द्या पेट्रोलियम मंत्री प्रधान यांच्याकडे मुंबई अध्यक्ष अॅड शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

पर्यावरण पुरक असणारा पाईप गॅस मुंबईतील स्मशानभूमींना सवलतीने देण्यात यावा अशी मागणी आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिल्लीत भेटून केली.

नॅचरल गॅस हा पर्यावरण पुरक असून स्मशानभूमींना तो सवलतीने उपलब्‍ध करून दिल्यास लाकाडाचा वापर करून पर्यायाने झाडांची कत्तल कमी होऊ शकेल. तसेच लाकडाच्या जाळण्यामुळे निर्माण होणारा धुर व त्याचे प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने सवलतीच्या दराने पाईप गॅस उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी धर्मेद्र प्रधान यांच्याकडे केली.

सांताकुझ पश्चिम येथे स्थानिक नागरीक एकत्र येऊन नॅचरल गॅसवर चालणारी विद्यृत दाहिनी उभारून पर्यावरण पुरक स्मशानभूमी उभी केली. या स्मशान भूमीलाही सवलतीने गॅस मिळावा अशी विनंती करतानाच अशाच प्रकारे मुंबईतील सर्वच स्मशानभूमीमध्ये पाईपने गॅस पुरवाठा सवलतीने करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.

रेल्‍वे हद्दीत वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांना परवानगी द्या

मुंबईसह राज्‍यात रेल्‍वे हद्दीत वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांना परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी  आज पुन्‍हा दिल्‍ली येथे जाऊन मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी रेल्‍वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली.  रेल्‍वे हद्दीतील वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांवर फेरिवाल्‍यांसोबतच कारवाई करण्‍यात येते या विक्रेत्‍यांचे मोठे नुकसान दरवेळी होते.  तसेच वृतपत्र विक्रेता हा वृतपत्राच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचा घटक असल्‍यामुळे  रेल्‍वे हद्दीतील विक्रेत्‍यांनाही रेल्‍वेने परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी आज पियुष गोयल यांच्याकडे पुन्हा केली. 

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *