Breaking News

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी फडणवीसांना समजून सांगा, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा १०० एकरच वावर विकत घेतलं नाही तर भाड्याने घेतलंय, सदावर्ते तुमचाच कार्यकर्ता

आंतरावली सराटे येथील जाहिर सभेसाठी आम्ही १०० एकराचं वावर घेतल्याचं समजताच काही जण आमच्यावर मराठा समाजानेच निवडूण दिलेल्यांकडून आमच्यावर आरोप करायला लागले की, इतका पैसा आला कोठून यांना १० कोटी मिळाले. निवडून दिलेल्या आमदाराने मराठा समाजाचा पैसा खाल्यानेच त्यांना तिकडचं बेसण खाऊन यावं लागलं असा उपरोधिक टोला मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव घेता लगावला.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, हे वावर काय आम्ही विकत घेतलं नाही, तर ते भाड्याने घेतलं आहे. तसेच या वावराचे भाडे देण्यासाठी १२८ गावांपैकी २२ गावांतील शेतकऱ्याने, त्याच्या शेतात घाम घाळून पैसे दिलेत असे भुजबळांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत आणखी २३ व्या गावातील मराठा समाजाने पैसे जमा केलेत पण ते आम्ही अजून घेतले नसल्याचे स्पष्ट करत हि सभा काय पैशासाठी घेतली नाही तर समाजाला एकत्र आणण्यासाठी घेतल्याचंही स्पष्टीकरण यावेळी दिले.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर काही जण न्यायालयात गेले आणि तेथे त्यांनी विरोध केला. न्यायालयात जाणारे हे फडणवीस यांचेच कार्यकर्त्ये आहेत हे आम्हाला माहित आहेत. त्यामुळे फडणवीस तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला समजून सांगा उगाच मराठ्यांना अंगावर घेऊन नका असे इशारा भाजपाचे आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्त्ये अॅड गुणरत्न सदावर्ते यांचे नाव घेता दिला.

त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनाही माझं सांगणं आहे की, फडणवीस यांना समजून सांगाव की, उगाच आपल्या कार्यकर्त्यांना आमच्या विरोधात उभ करून मराठ्यांना अंगावर घेऊ नये. आणि हे ही विसरू नये की, भाजपाच्या १०५ आमदारांना या मराठ्यांनीच निवडूण दिलंय असा सूचक इशाराही भाजपाच्या नेत्यांना यावेळी दिला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

भारत, बिहारमधील माहितीमुळे अस्वस्थ झाला देशाने जातीय विषमतेवर मौन धारण

आधी आमचा एक्स-रे होता, आता आमचा एमआरआय आहे. बिहारमधील जात ‘जनगणने’ डेटाच्या पहिल्या फेरीने जाती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *