Breaking News

नागरीकांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी मंत्री बडोलेचा ई-संवाद व्हॉट्सअँप, ऑनलाईन पध्दतीने प्रश्न विचारण्याची संधी

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ज्येष्ठ नागरीक, मागासवर्गीय, दिव्यांगांसह सर्व मागासवर्गीय नागरीकांसाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात. तरीही अनेक नागरीकांना या योजनांचा लाभ मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी या सर्वच नागरीकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला असून या नागरीकांच्या प्रश्नांना थेट ऑनलाईन पध्दतीने उत्तरे देणार आहेत.
मागासवर्गीय, भटके-विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग, नीराश्रित, अनुसूचित जाती या सर्व समाज घटकांसाठी सामाजिक न्याय विभागासाठी विविध योजना राबविण्यात येतात. तसेच या निर्णयांची माहिती नागरीकांपर्यत पोहोचण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. तरीही अनेकवेळा प्रशासनाच्या लालफीतीच्या कारभारामुळे नागरीकांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विभागाकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयाची माहिती आणि योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी नागरीकांशीच थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार पार्थ नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून व्हॉट्सअँप आणि ऑनलाईन पध्दतीने नागरीकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे मंत्री बडोले यांच्याकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी ८३८४८५८६८५ या व्हॉट्सअँप क्रमांकाद्वारे १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता नागरीकांना प्रश्न विचारता येणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर elearning.parthinfotech.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही नागरीकांना थेट मंत्री बडोले यांना प्रश्न विचारून आपल्या समस्यांचे निराकरण करून घेता येणार आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

One comment

  1. अनिल कुमार वासुदेव टेंभरे

    ग्रा. पं. चिचगांव,पं. स. गोरेगांव यानी मागील सहा महिने पासुन माझे घरासमोर नाली बनविली अजून जाने येने करीता ओटा बणविण्यात आला नाही आणखी किती दिवस वाट पाहावी लागेल साहेब
    आपला स्नेही
    अनिल कुमार टेंभरे ,चिचगांव पं. स. गोरेगाव
    दि.14.11.018

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *