Breaking News

राहुल गांधी सोमवारी संध्याकाळी नांदेडमध्ये: वडील भारत छोडो तर मुलगा भारत जोडोत

केरळपासून सुरु झालेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा त्यांच्या नियोजित वेळेनुसार उद्या सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचत आहे. भारत जोडो यात्रा नांदेडमधील देगलूर येथे पोहचल्यानंतर यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.

भारत जोडो यात्रेचे स्वागत कला मंदीर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात येणार आहे. त्यानंतर काही काळ थांबल्यानंतर रात्रो ९ वाजता वन्नाळीकडे प्रस्थान करणार आहे. रात्रो ११ वाजता वन्नाळी येथे गुरूद्वारा साहेबजादे आगमन होणार आहे. त्यानंतर गुरूनानक देवजी गुरूपुरब अरदास या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर देगलूरकडे जाणार असून तेथेच मुक्काम करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

दरम्यान, काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील नियोजन समितीत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सपकाळ यांनी प्रदेश काँग्रेसच्या विविध पदांवर काम केले असून जाहीर सभा, विविध कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षासाठी उल्लेखनीय काम केले. राजस्थान विधानसभा निवडणुकीतही अभिजित सपकाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियाची बाजू भक्कमणे मांडली होती.

वडील भारत छोडो आंदोलनात तर मुलगा भारत जोडो आंदोलनात

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो आंदोलनात अनेकजण सहभागी होत आहेत. यात सहभागी होणाऱ्यामधील काही जण आपल्याकडे लक्ष वेधून घेतात. या यात्रेत सहभागी झालेले महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष तथा अमरजीत मनहास यांच्याकडेही अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. वास्तविक मनहास हे काँग्रेसचेच कार्यकर्त्ये आहेत. मात्र त्यांच्याकडे लक्ष्य वेधण्यामागे एक खास गोष्ट आहे. ती म्हणजे अमरजीत मनहास यांचे वडील रघवीर मनहास यांनी इंग्रजांच्या विरोधात छेडण्यात आलेल्या भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे त्यांचा सहभाग गांधी-नेहरूं परिवारासोबत होता. आता स्वत: अमरजित मनहास हे आजपासून राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे वडीलांनी सुरु केलेल्या कार्यात मुलानेही आपला सहभाग घेतल्याने अमरजीत मनहास यांनी वडीलांचा वारसा तसाच पुढे सुरु ठेवल्याचे दिसून येत आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *