Breaking News

संजय राऊत म्हणाले, कुणी कितीही शाली पांघरा, हिंदू हृदयसम्राट एकच शालीवरून मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र

महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत आयोजित सभेसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे पोहोचले असताना. त्यांच्या पुणे ते औरंगबाद प्रवासा दरम्यान ठिकठिकाणी राज ठाकरे यांना भगवी शाल पांघरत कार्यकर्त्यांनी सन्मानित केले. त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट एकच आहेत. देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच लोकांना माहिती आहेत. कुणी कितीही शाली पांघरल्या, शिवसेना प्रमुखांच्या कितीही नकला केल्या, तरी शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट एकच असा टोला लगावला.

रविवारी राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता लागलेली असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ठाण्यामध्ये मिसळ महोत्सवाला हजेरी लावल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

महाराष्टात सुडाचं राजकारण सुरू असून हे राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राला आणि देशाला हे परवडणारं नाही, इतकंच मी सांगेन अशा शब्दांत संजय राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज ठाकरेंचं आज ठिकठिकाणी स्वागत झाल्याबद्दल विचारणा केली असता संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंच्या स्वागताकडे बघण्यासारखं काय आहे. महाराष्ट्रात राजकारणाची, नेत्यांची मोठी परंपरा आहे. सभा होत असतात. सभांना लोक जात असतात. नेत्यांचं त्यांचे समर्थक स्वागतही करत असतात.

हिंदू ओवैसी आणि मुस्लीम ओवैसी हे दोन्ही महाराष्ट्रात आहेत. एका ओवैसीला उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका जिंकण्यासाठी वापरण्यात आलं, त्याच पद्धतीने नवहिंदू ओवैसींना महाराष्ट्रात शिवसेनेच्या विरोधात लढवून हिंदूंचंच नुकसान करण्याचं काम भाजपा करतोय. याचा औरंगाबादमध्ये अजिबात फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे अर्थात रविवारी औरंगाबादमध्ये सभा होणार असून त्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज ठाकरे आजच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. वाटेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत देखील करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहे. त्यातच त्यांच्या सभेच्या टिझरला देवेंद्र फडणवीस यांचा आवाज असल्याने राज ठाकरे नेमके भाजपाच्या विरोधात बोलणार की, पुन्हा महाविकास आघाडी सरकारव निशाणा साधणार हे लवकरच कळणार आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *