Breaking News

राजकारण

नव्या सरकारचे ९ दिवसांचे पावसाळी अधिवेशन, मात्र ३ दिवस सुट्टीचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

राज्यातील नव्याने स्थानापन्न झालेल्या पण अद्यापही अस्थिरतेच्या भावनेने ग्रासलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथेप्रमाणे नियमित पावसाळी अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत नव्या सरकारचे नऊ दिवसांचे पावसाळी अधिवेशन बोलाविले असून त्यातील तीन दिवस सुट्टीचे राहणार आहेत. सदरचे सन २०२२ …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा अनेकदा दिल्ली दौरा पण राज्यासाठी… शिवसेनेने विरोधी पक्षनेता निवडण्यापूर्वी आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला पाहिजे होती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. विधान भवनातील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

मंत्री संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा, तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर राठोड यांचा इशारा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सहकार्याने सरकार स्थापन केले. मात्र या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांचा समावेश करताच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपाच्या ‘हर घर तिरंगा’ इव्हेंटसाठी चीनमधून तिरंगा नाना पटोले यांची बुलढाणा जिल्ह्यात तर बाळासाहेब थोरात यांची धुळ्यात आझादी गौरव पदयात्रा

अत्याचारी ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी मोठा व प्रदिर्घ लढा द्यावा लागला. काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकवटला आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या काँग्रेस विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते लोक आज ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या नावाखाली इव्हेंटबाजी करत आहेत. या इव्हेंटबाजीसाठी चीनमधून तिरंगा झेंड्यांची …

Read More »

अजित पवार म्हणाले, …दुप्पट मदतीचा निर्णय फसवा, धुळफेक करणारा एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीने झालेले पिकांचे, घराचे, शेतजमीनींचे नुकसान प्रचंड आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने सरकारने दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार व बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला …

Read More »

उध्दव ठाकरेंचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, त्या स्थगितीमुळे १० हजार कोटी वाढले मुंबई मेट्रो मार्गिका-३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

बहुचर्चित कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गासाठी आरे येथे कारशेड उभे करण्याच्या कामास तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती दिली. मात्र सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचा तो निर्णय रद्दबातल करत आरे येथेच कारशेड करण्याचे आदेश जारी केले. यासंदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी घोषणा; नव्या मंत्र्यांना आवाहन दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत-एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार

मागील दोन तीन महिन्यापासून राज्यातील जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आणि शेतजमीन खरवडून गेल्याचे तर उभ्या पिकात पाणी शिरल्याचे चित्र आजही पाह्यला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरीव मदत दिली जाणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली …

Read More »

उध्दव ठाकरे-एकनाथ शिंदे वादात सर्वोच्च न्यायालयाची पुन्हा तारीख १२ ऑगस्टची सुनावणी आता २२ ऑगस्टला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण रोवल्यामुळे सांसदीय राजकारणात आणि कायद्यातील तरतूंदीबाबत काही नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या राजकिय लढाईवर लवकर निकाल लागून कायद्यातील तरतूंदीचा नव्याने अर्थ आणि सासंदीय राजकारणात निर्माण झालेला पेच याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेले असताना …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर बच्चू कडू म्हणाले, जे उशीरा आले ते पहिल्या पंगतीत… राजकारणात हे चालूच असतं

काल मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेलेले शिंदे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सकाळी नंदनवन या त्यांच्या शासकिय निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवलं असं सूचक विधान करत आपली नाराजी …

Read More »

शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंना म्हणाले, कोणी वाद वाढवित असेल तर लोक पाठिंबा… वेगळा पक्ष आणि वेगळे चिन्ह घेवू शकतात

जवळपास एक महिन्याहून अधिक काळ शिवसेनेला खिंडार पाडत वेगळा मार्ग स्विकारलेल्या एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. तसेच यासह अनेक प्रश्नांवरून सर्वोच्च न्यायालयात लढाईही सुरु आहे. तरीही नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »