Breaking News

राजकारण

सुनिल प्रभू म्हणाले, आमचं दु:ख विसरून फडणवीस याचं दु:ख जास्त वाटतंय राहुल नार्वेकर यांच्यावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना साधला निशाणा

विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर अभिनंदनपर प्रस्तावावरील चर्चेत शिवसेनेचे विधिमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. तसेच आमचा व्हिप झुगारून ३९ सदस्यांनी विरोधात मतदान करत लोकशाहीची पायमल्ली केली हे देखील इतिहास कधी विसरणार नाही. त्यामुळे याची देखील खंत …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, भाजपावाल्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे झाले ते योग्य का? सभागृहातच सवाल करताच भाजपाने बाके वाजवून दिले उत्तर

राज्यात झालेल्या सत्तासंघर्षात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून गेले. त्यामागे भाजपाचा हात असल्याचे उघडकीस आल्यानंतर हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतच भाजपाच्या सदस्यांना खोचक सवाल करत भाजपा वाल्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावे की, मागील १० दिवसात जे …

Read More »

विधानसभाध्यक्ष निवडणूकीत शिवसेना आणि शिंदे गटाकडून परस्पर विरोधी तक्रार व्हिप पाळला नाही म्हणून शिंदे गटाकडून १६ तर शिवसेनेकडून ३९ जणाविरोधात

नव्याने स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या दोन दिवसीय विशेष विधानसभा अधिवेशनात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ३९ आमदारांनी पक्षाच्या व्हिपच्या विरोधात मतदान केल्याची तक्रार केली. तर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनी १६ आमदारांनी व्हिपच्या विरोधात मतदान केल्याची तक्रार करत परस्पर विरोधी …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारने पहिली लढाई जिंकली: नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली

शिवसेनेत बंडखोरी करून नवे सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आज संसदीय लढ्यातील पहिली लढाई जिंकली. नव्या राज्य सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांच्या आदेशान्वये विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले. या अधिवेशनात विधानसभेच्या रिक्त अध्यक्षपदासाठी आज निवडणूक शिरगणतीनुसार घेण्यात आली. या निवडणूकीत …

Read More »

शिवसेनेच्या व्हिपवर शरद पवार म्हणाले, बंडखोरांना व्हिप पाळावाच लागेल अन्यथा… विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी अद्यापही नरहरी झिरवळ

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आणि अध्यक्ष पदाचे अधिकार असलेले अजूनही नरहरी झिरवळ आहेत. कायद्याने त्यांना अधिकार असल्याने, त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांची आम्ही बैठक घेऊन, एकत्रित अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहोत. पक्ष म्हणून विधानसभेतील व्हिप आणि संघटनात्मक काम या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे गटनेत्याने दिलेला व्हीप आमदारांना …

Read More »

कडेकोट बंदोबस्तात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदार मुंबईत दाखल बंडखोर आमदार आणि भाजपा आमदारांची संयुक्त बैठक होणार हॉटेलमध्ये

शिवसेनेतील ३९ आमदारांना सोबत घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा एकनाथ शिंदे यांनी फडकाविला. त्यानंतर या आमदारांना सूरत मार्गे गुवाहाटीला नेले. तेथून ७ दिवस पूर्ण झाल्यानंतर मागील चार दिवसांपासून गोव्यातील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर आज या सर्व बंडखोर आमदारांना सोबत घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले. मात्र …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, … काय चाललंय हे जनतेला दिसतय महाविकास आघाडीचे राजन साळवी उमेदवार...

आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो. मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे. यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. आज विधानसभा अध्यक्ष …

Read More »

शरद पवार म्हणाले, मी अनेकवेळा शपथ घेतली पण… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेंना पेढा भरविल्याप्रकरणी लगावला टोला

शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र नव्या सरकारच्या स्थापनेसाठी दावा करण्यास गेलेल्या एकनाथ शिंदे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पेढा भरविल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे. भारतीय …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मेहुण्याला दिलासा ईडीचा विरोध असतानाही सीबीआयचा अहवाल न्यायालयाने स्विकारला

राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय यंत्रणांकडून उध्दव ठाकरे यांच्या नातेवाईकांवर ईडीच्या धाडी पडण्यास सुरुवात झाली. तसेच उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीचे ६ प्लॅट्सही ईडीने जप्त केले. मात्र आता उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून तीन दिवसांचा कालवधी पूर्ण …

Read More »

शिवसेनेच्या व्हिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया विमानतळावर दाखल होताच प्रतिक्रिया दिली

राज्यात हिंदूत्वाच्या नावाखाली सत्ता स्थापनेचा संघर्ष एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात झाल्यानंतर आता विधिमंडळ संसदीय राजकारणात महत्वाची असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहिर केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेच्या राजन साळवी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेकडून राजन साळवी यांनाच मतदान करावे यासाठी एकनाथ …

Read More »