Breaking News

शिवसेनेच्या व्हिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया विमानतळावर दाखल होताच प्रतिक्रिया दिली

राज्यात हिंदूत्वाच्या नावाखाली सत्ता स्थापनेचा संघर्ष एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात झाल्यानंतर आता विधिमंडळ संसदीय राजकारणात महत्वाची असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहिर केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेच्या राजन साळवी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेकडून राजन साळवी यांनाच मतदान करावे यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. मात्र या व्हिप जारी करण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. उद्या ३ जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. व्हीप जारी केल्याने एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहे. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

आम्ही बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहोत. आमच्याकडे बहुमत असल्याने विजय आमचाच होईल असेही ते म्हणाले.

बंडखोर सर्व आमदारांना आणण्यासाठी ते गोवा विमानतळावर आले होते. त्यावेळी ते  प्रसार माध्यमांशी बोलत होते.

खरंतर, बंडखोरी केल्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी शिवसेनेचे आमदार मुंबईत दाखल होत आहेत. ते गोव्यातून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते होते. पण त्यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून उध्दव ठाकरे यांनी त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली. तसेच नवीन गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती केली. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आगामी ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर आणि राज्यपालांनी बहुमत सिध्द करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या आदेशाच्या प्रश्नावर सुणावनी होणार आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्याकडून पुढील न्यायालयीन लढाईचा भाग म्हणून आता या काही गोष्टी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Check Also

अखेर नारायण राणे यांना भाजपाने केली उमेदवारी जाहिर

राज्यातील लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात सर्वच राजकिय पक्षांकडून आस्ते कदम टाकण्यात येत आहे. भाजपाकडून तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *