Breaking News

शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंना म्हणाले, कोणी वाद वाढवित असेल तर लोक पाठिंबा… वेगळा पक्ष आणि वेगळे चिन्ह घेवू शकतात

जवळपास एक महिन्याहून अधिक काळ शिवसेनेला खिंडार पाडत वेगळा मार्ग स्विकारलेल्या एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. तसेच यासह अनेक प्रश्नांवरून सर्वोच्च न्यायालयात लढाईही सुरु आहे. तरीही नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकिय वडीलकीचा सल्ला दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर ते वेगळा पक्ष काढू शकतात आणि वेगळं चिन्ह ठरवू शकतात. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असे वक्तव्य करत अप्रत्यक्ष शिवसेनेशी सामोपचाराने चर्चा करून वेगळा पक्ष आणि चिन्ह घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाल्याने, मूळ शिवसेना कोणाची? आणि धनुष्यबाण कोणाचं? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. तसेच निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे गटाला मूळ शिवसेना कोणाची? याबाबतचे पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, माझेही काँग्रेससोबत मतभेद झाले होते. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष काढला आणि वेगळं चिन्ह ‘घड्याळ’ घेतलं. आम्ही त्यांचं चिन्ह मागितलं नाही किंवा वाद वाढवला नाही. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत असेही त्यांनी एकप्रत्यक्ष सूचना त्यांना केली.

धनुष्य बाण हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे चिन्ह आहे. त्यांच्याकडून अशा प्रकार चिन्ह काढून घेणे योग्य दिसणार नसल्याचेही ते म्हणाले.

एकदंरीतच शिवसेनेतील बंडामागे भाजपाच असल्याचे आता भाजपाचे नेतेच दावा करू लागले आहेत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातही महाशक्तीचा हस्तक्षेप सध्या होत असल्याचे अप्रत्यक्ष जाणवू लागल्याने पवार यांनी एकनाथ शिंदे यांना हा

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *