Breaking News

मुंबईसह राज्याचे रक्षण करणाऱ्यांचे आभार मानत, मुख्यमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची मुख्यमंत्री ठाकरेनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी
‘निसर्ग ‘ चक्री वादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणतात,
“महाराष्ट्रावर करोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्री वादळाचा तडाखा बसला.संकट म्हटले तर मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झूंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबा देवीचीच कृपा मुंबई वर आहे तशी पंढरपूरच्या विठु माऊलींचे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी,जिल्हा प्रशासन,आपत्कालीन व्यवस्थापन,वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्या सुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या.
निसर्गा पुढे कोणाचेही चालत नाही. पण संकट काळात महाराष्ट्र एक आहे.खंबीर आहे हे या वादळात दिसुन आले. हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातुन बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *