Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसची अंतिम यादी अर्ज छाननीनंतर होणार जाहीर अंतिम यादी ७ तारखेला जाहीर करणार

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वाधिक नेते, आमदारांनी पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला. तरीही राष्ट्रवादीकडून नव्या दम्याच्या उमेदवारांना उमेदवारी देत आपला बालेकिल्ला लढविण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु राष्ट्रवादीकडून अद्याप अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही अंतिम यादी अर्ज छाननीनंतर ७ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
निवडणूकीच्या निमित्ताने उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षांकडून बंडखोरीची लागण होवू नये यासाठी काळजी घेतली. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अंतिम नावांची यादी भाजपा आणि शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली. त्या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून सातत्याने नावांमध्ये बदल करणे, आयत्यावेळचा उमेदवार आदींची सांगड घालत उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ उलटून गेल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसकडून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अंतिम उमेदवार कोणते याची चर्चा सर्वचस्तरावर सुरू आहे.
भाजपा-शिवसेनेतील तिकिट न मिळलेले अनेक नाराज राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होते. त्यातील काहीजणांनी स्वतंत्र किंवा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली होती. त्यामुळे अनेक संभावित उमेदवारांची नावे यादीत समाविष्ट करता यावीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रसकडून जाणीवपूर्वक यादी जाहीर करण्यात आली नाहीत. मात्र आता अर्ज माघारीच्या दिवशी या संभावित उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याने त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *