Breaking News

मुस्लिम संघटनांची मागणी, राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे राजकारण करू नका जमाते ए-इस्लामी संघटनेने केली मागणी

देशातील असंख्य भारतीय हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत आहे. मात्र या राम मंदिराच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाचे राजकियकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमाचा उपयोग भाजपाकडून त्यांच्या एका राजकिय साधणाचा वापर करत असल्याचा आरोप जमात ए-इस्लामी संघटनेने करत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे राजकारण करू नका अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.

जमात ए-इस्लामी संघटनेचे उपाध्यक्ष सलिम इंजिनिअर यांनी मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात धार्मिक धुव्रिकरणाचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा इशारा देत पुढे म्हणाले की, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस यांनी नुकतेच एक वक्तव्य करत मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवसाची तुलना स्वातंत्र्य दिनाशी करत एकप्रकारे आम्ही विरूध्द ते असे सूचक वक्तव्य करत धार्मिक धुव्रिकरणाचा प्रयत्न सुरु केला असल्याची बाबही अधोरेखित केले.

पुढे बोलताना सलिम इंजिनिअर पुढे म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्यात येत असल्याच्या प्रयत्नाचा जमात ए-इस्लामी निषेध करत असल्याचेही जाहिर केले.

तर जमात उलेमा ए हिंदचे प्रमुख मोहम्मद असाद मदानी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी धानीपूर येथील मस्जिद उभारणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत नियोजित राम लल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना मस्जिदीचे काम पूर्ण होण्याआधी करू नये अशी मागणी केली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त विशिष्ट समुदायाचे नसून संपूर्ण भारतीयांचे असल्याची बाबही हिंदूत्ववादी नेत्यांच्या नजरेस आणून दिली.

Check Also

सॅम पित्रोदा यांनी दिला काँग्रेसच्या पदाचा राजीनामा पोड कास्टमुळे टीकेचे धनी बनल्याने दिला अध्यक्ष पदाचा राजीनामा

सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले असून हा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *