Breaking News

मोदी सरकारमधील मंत्री म्हणाले, “NYT मिडीया सुपारीबाज” माजी लष्करप्रमुख आणि राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंग याची मुक्ताफळे

मराठी ई-बातम्या टीम

मोदी सरकार आणि इस्त्राईलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्यात शस्त्रास्त्र खरेदी कराराच्यावेळी एनएसओ कंपनीकडून पेगॅसिस सॉफ्टवेअर खरेदी केल्याचा गौप्यस्फोट द न्यु यॉर्क टाईम्सने केल्यानंतर यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्हि.के.सिंग यांनी थेट या वर्तमान पत्रालाच सुपारीबाज मिडीया म्हणून हिणवत आपली बौध्दीक श्रीमंती दाखवून दिली आहे.

शुक्रवारी न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने २०१७ मध्येच क्षेपणास्त्र प्रणालीसह शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी २ अब्ज डॉलर (१५ हजार कोटी) किमतीच्या संरक्षण करारात इस्रायली पेगॅसस स्पायवेअर खरेदी केले होते. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने स्पायवेअर खरेदी करून ते वापरण्याच्या उद्देशाने त्याची चाचणीही केली होती, असे वृत्तपत्राने केलेल्या वर्षभराच्या तपासात उघड झाले. एफबीआयला हे स्पायवेअर पाळत ठेवण्यासाठी वापरायचे होते. या वृत्तानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उडविल्यानंतर राज्यमंत्री व्हि.के.सिंग यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जगभरात या स्पायवेअरचा वापर कसा केला गेला याचा उल्लेख न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात करण्यात आला आहे. पत्रकार आणि विरोधकांना लक्ष्य करणाऱ्यासह मेक्सिको, सौदी अरेबियामधील महिला हक्क कार्यकर्त्यांच्या विरोधात त्याचा वापर करण्यात येत होता. इस्रायली स्पायवेअरचा वापर पत्रकार जमाल खाशोगी यांच्या विरोधातही करण्यात आला होता, ज्यांची सौदीच्या नागरिकांनी हत्या केली होती. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने नवीन करारांतर्गत पोलंड, हंगेरी आणि भारतासह अनेक देशांना पेगॅसस देण्यात आल्याचा दावा त्या वृत्तात करण्यात आला आहे.

जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला भेट दिली होती. भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच इस्रायल दौरा होता. भारताने पॅलेस्टाईन आणि इस्रायल संबंधांबाबत धोरण आखल्यानंतर ही भेट झाल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. मात्र, पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा मैत्रीपूर्ण होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसले. यामध्ये दोन्ही देशांमधील दोन अब्ज डॉलरच्या करारामध्ये शस्त्रे आणि गुप्तचर यंत्रणा खरेदीचा समावेश होता. तसेच पेगॅससचाही या व्यवहारात सहभाग होता.

त्यानंतर पेगॅसस स्पायवेअरच्या खुलाशांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंह यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. जनरल विजय कुमार सिंग यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सुपारी मीडिया म्हणत त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हीके सिंह यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. “तुम्ही न्यूयॉर्क टाइम्सवर विश्वास ठेवू शकता का? ते ‘सुपारी मीडिया’ म्हणून ओळखले जाते, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *