Breaking News

ठाणे जिल्ह्यातील विविध भूसंपादनात प्रांत उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी करा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

ठाणे जिल्ह्यात समृध्दी महामार्ग, बुलेट ट्रेन मार्ग, मुंबई-बडोदा महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पांचे काम सूरु आहेत. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना उपविभागीय कार्यालय, भिवंडी या कार्यालयाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या प्रांत उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करून चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

ठाणे जिल्ह्यात विविध विकासकामांसाठी भूसंपादन करताना अनधिकृत बांधकामधारकांना शेतकऱ्यांपेक्षा जास्तीचा दर दिला असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

२४ फेब्रुवारी, २०२२ रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात मुख्य आरोपी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी यांना अटक करण्यात आली होती. सदर प्रकरणी प्रांत उपविभागीय अधिकारी वाघचौरे यात सहभागी असताना त्यांची चौकशी देखील करण्यात आलेली नाही.
तत्कालीन उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांची कारकीर्द वादग्रस्त ही वादग्रस्त आहे. नळदकर यांच्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी अडवणूक करून फसवणूक केल्याची तक्रारी करुनही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या या अधिकाऱ्यांवर कारवाई करून चौकशीची मागणी दानवे यांनी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसरण लवकरात लवकर करण्याची मागणी देखील केली आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *