Breaking News

शरद पवार आणि अमित शाह यांची भेट? ही तर अफवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

गेले दोन दिवस ट्वीटरवर बातम्या पसरवण्यात आल्या आणि दिव्यभास्करमध्ये लहान बातमी करुन चॅनेलवर बातम्या दाखवायला सुरुवात करण्यात आल्या. एका पत्रकाराकडून प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः अमित शहा यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.

ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही. आणि भेटण्याचा उद्देश किंवा कारण असू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर खळबळजनक आरोप केल्यानंतरही परत भाजपालाच पुन्हा दोन पावले मागे सरकावे लागले. मात्र सरकार कोसळण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने अखेर शरद पवार हे गुजरातला अमित शाह यांच्या भेटीसाठी गेल्याचे वृत्त चालविण्यात येत असल्याचे अन्य एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.

वास्तविक पाहता शरद पवार यांचा राजकिय लौकिक पाहता ते कोणत्याही पक्षाच्या दोन नंबरच्या नेत्याशी कधीही राजकिय चर्चा करत नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचे थेट सबंध असताना पवार कधीही अमित शाह यांना असे भेटणे शक्यच नाही. त्यातच भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर इतके खोटारडे आरोप केल्यानंतर तर ते असे भेटणे अशक्यच असल्याचे मत व्यक्त करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे त्यांच्या मर्जीने स्थापन झालेले असताना आणि ते टिकावे यासाठी पवार स्वत: प्रयत्नशील असताना त्यांच्याकडून अशी कृती कधीच होणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *