Breaking News

खेड येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेची तात्काळ सीआयडी चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस प्रशासनाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिकेच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची काल सोमवारी घटना घडली. यासंदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुद्दा उपस्थित करत त्याचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे काल भिमा कोरेगांव येथील दलितांवर झालेल्या हिसांचार प्रकरणी संभाजी भिडे याला अटकेसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर या घटनेची नोंद घेण्याचे आदेश विधानसभेत अध्यक्षांनी तर विधान परिषदेत सभापतींनी राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने या घटनेची नोंद घेतली.

या घटनेच्या अनुषंगाने रत्नागिरीचे पालकमंत्री तथा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि पीआपपीचे आमदार जोगेंद्र कवाडे यांच्या शिष्टमंडळाने स्वतंत्ररित्या भेट घेतली. त्यावेळी या घटनेची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळा विटंबनेची तात्काळ सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले.

खेड तालुक्यातील तीन बत्ती नाकानजीक जिजामाता उद्यानात पालिकेतर्फे बसविण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याची काही समाजकंटकांनी सोमवारी पहाटे विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वच समाजातील नागरीकांनी निषेध नोंदवित खेड तालुक्यात बंद पाळला.

ही घटना सकाळी पालिकेचे कर्मचारी या परिसरात साफसफाई करण्यासाठी आले असता उघडकीस आली. सदर कर्मचाऱ्यांनी त्याची माहिती तात्काळ पालिका अधिकारी, पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पुतळ्याचा विटंबना केलेला भाग पांढऱ्या कपड्याने झाकुन ठेवला. पुतळा विटंबनेचे वृत्त समजताच आंबेडकरी अनुयांयानी पुतळ्याच्या परिसरात जमा होत तात्काळ गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली. याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. पर्यायवरण मंत्री रामदास कदम, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, पीआरपीचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत कडक कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत तात्काळ सीआयडी चौकशीचे आदेश पोलिसांना दिले.

 

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *