Breaking News

कष्टकऱ्यांच्या कुटुंबाला ७५०० रूपये, विम्याचे संरक्षण द्या कामगार कृती समितीकडून मागणी दिवस

नाशिक-मुंबई: प्रतिनिधी
लॉकडावून काळामध्ये कामगार कष्टकऱ्यांची उपासमार होत आहे. त्यांना मोफत रेशन, आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना ७५०० रुपये आर्थिक सहाय्य, स्थलांतरित कामगारांसाठी पुरेशा ट्रेन व बसेसची मोफत सुविधा ,बंद उद्योग, पॉवर लूम उद्योग व अन्य व्यवसाय सुरू करा ,१२ तासाचा कामाचा दिवस करणारा अध्यादेश रद्द करा, उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , गुजरात राज्य सरकारने तीन वर्षासाठी कामगार कायदे निलंबित करण्याचा निर्णय मागे घ्या ,कामाच्या ठिकाणी आरोग्य व सुरक्षेची व्यवस्था करा, मार्च-एप्रिलचे वेतन न देणाऱ्या मालकांविरुद्ध कारवाई करून कामगारांना वेतन मिळवून द्या, योजना कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवा ,करोना लढाईत कामावर असलेले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल , सफाई कामगार व अत्यावश्यक उद्योग व सेवेतील कामगार कर्मचारी यांना संरक्षक किट व ५० लाखाचा विमा द्या, या मागण्यांसाठी आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यभर मागणी दिवस पाळण्यात आला.
जिल्ह्यातील उद्योगातील कंत्राटी व हंगामी कामगार तसेच अनेक कंपन्यातील कायम कामगारांना मार्च लॉकडावून काळाचे व एप्रिल महिन्याचे वेतन मालकांनी दिलेले नाही. सातपूर औद्योगिक वसाहतीतील एमजी इंडस्ट्रीज , सागर इंजिनिअरिंग , सुप्रीम इक्वीपमेंट, अंबड औद्योगिक वसाहतीतील ऑटो काप इंडिया, नाशिक फोर्ज, रेनबो डेको प्लास, आरडी इंजिनिअरिंग, असोसिएटेड इंजीनियरिंग, काक्स रिसर्च सेंटर, सुविध इंजीनियरिंग इगतपुरीतील जिंदाल पॉलिफिल्म, सिन्नर मधील सूर्या कोटिंग याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयात व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही उपयोग झालेला नाही. कंत्राटी व हंगामी कामगार कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने कामगार तक्रार करत नाहीत असे नाशिक वर्कस युनींयनचे तुकाराम सोनजे, संतोष काकडे यांनी सांगितले.
मालेगाव मध्ये पावर लूम कामगारांनाही मालकांनी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार लाकडाऊन काळाचे वेतन दिलेले नाही. तसेच घर कामगार , बांधकाम मजूर , वीटभट्टी कामगार, अनेक दुकाने मॉलमधील कामगारांनाही अनेक मालकांनी एप्रिल महिन्याचे वेतन दिले नाही ,अशा तक्रारी आल्या असून यावेळी घर कामगार व बांधकाम कामगार संघटनेच्या सेक्रेटरी सिंधू शार्दुल यांनी सांगितले
त्यामुळे लाक डाऊन असूनही सिटू संघटनेच्यावतीने खुटवडनगर येथे हातात मागण्यांचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले.
मालेगाव शहरातही पावर लूम कामगारांनी त्यांच्या घरासमोर उभे राहून हातात फलक लावून आंदोलन केले .
वरील क्षेत्रातील कामगारांना त्यांचे वेतन मिळवून द्यावे, या मालकांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत व विविध कामगार कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी सिटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे व जिल्हा सेक्रेटरी देविदास आडोळे यांनी केली.
केंद्र सरकारने ताबडतोबीने संकटात असलेल्या श्रमिकांना जगवण्यासाठी निर्णय करावेत व मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा लाक डाऊन उठल्यानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सीटूचे व कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते डॉ. डी. एल. कराड आणि विश्वास उटगी यांनी दिला.

 

 

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *