Breaking News

जनता पुरात तर भाजपा -शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात दोन्ही पक्षांकडून लाजीरवाणे कृत्यः विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
कोल्हापूर, सांगली आणि कराड भागातील जनता पुराने त्रस्त असताना मदत व पुनवर्सन मंत्री सुभाष देशमुख हे पुण्यात पक्षाचा मेळावा घेण्यात मग्न असचे दिसून आले असून अशा असंवेदनशील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी ताततडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तसेच ज्या कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला पाच आमदार, दोन खासदार दिलेत ती शिवसेनाही पूरग्रस्तांना मदत पोहचवण्याकडे दुर्लक्ष करुन मातोश्रीवरही पक्षप्रवेशाचे सोहळे साजरे करत आहे हे लाजीरवाणे असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची संवेदनशील मातोश्री आता राहिलेली नसल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र, कोकणात जीवित व वित्त हानी झालेली आहे. आतापर्यंत राज्यात १४६ लोकांचा अतिवृष्टीमुळे हकनाक जीव गेला असून सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ गावात आज मदतकार्याची बोट उलटून ३२ लोकांचा बळी गेला, याला सरकारची नियोजनशून्यता व निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यावरचे संकट मोठे असून त्याला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावे अशी मागणी करत पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला महापुराने वेढलेले आहे. या भागातील शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. कोल्हापूर, सांगलीतील परिस्थिती अत्यंत भीषण आहे. शहराचा बहुतांश भाग पुराने व्यापलेला आहे. गत चार दिवसात होत असलेली अतिवृष्टी व त्यामुळे होऊ शकणारे परिणाम याबाबत गांभिर्याने विचार केला नाही. नियोजन, विभागांतर्गत समन्वय याचा अभाव व नेतृत्वाने केलेले दुर्लक्ष यामुळे हि परिस्थिती ओढवली असून याला राज्य सरकार व मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबई-बंगळूरू महामार्ग मागील पाच-सहा दिवसांपासून ठप्प आहे. पुरात सापडलेल्या लोकांपर्यंत मदत पोहचत नाही. एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा अत्यंत तोकडी पडलेली आहे. मुख्यमंत्री आधी प्रचार यात्रेत मश्गूल होते, तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीही फारसे गांभिर्याने पाहिले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पूर परिस्थिती राज्य सरकारच्या पूर्णपणे हाताबाहेर गेली असून लष्कराची मदत घेण्याची गरज आहे. कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणातून वेळीच पाणी सोडले असते तर कृष्णा खोऱ्यातील हानी काही प्रमाणात कमी झाली असती. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी महाराष्ट्राच्या विनंतीकडे सपशेल दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता दोन्ही राज्यात भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्राच्या विनंतीचा विचार करायला पाहिजे होता. येडीयुरप्पा ऐकत नसतील तर महाराष्ट्राने केंद्र सरकारला हस्तक्षेप करायला सांगायला पाहिजे होते अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
पुरामुळे दळणवळण ठप्प झाल्याने मुंबईला होणारा दूध व भाजीपाला पुरवठ्याची टंचाई होऊ शकते याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज होती. राज्यावर आलेले हे संकट नैसर्गिक असले तरी राज्य सरकारचा निष्काळजी व बेजाबदारपणाही तेवढाच जबाबदार आहे. लोकांचे बळी जाईपर्यंत सरकारला जागच येत नाही हे आतापर्यंतच्या घटनांवरून दिसून येते. सरकारने आता पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करावीत, राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या मदतीसाठी काम करावे आणि तातडीने शेतमाल, खाजगी संपत्तीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी. तसेच सर्वपक्षीय बैठक बोलावून करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करावी अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *