Breaking News

शिंदे फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा यांनी मागे घेतले शब्द

मागील आठवडाभरापासून अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा विरुद्ध बच्चू कडू असा चाललेला सामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर जवळपास संपुष्टात आला आहे . राणा यांनी कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप आणि त्यासंदर्भातील विधान मागे घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर कडू यांनी यासंदर्भात आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले असले तरी ते हा वाद आता वाढणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.

बच्चू कडू आणि रवि राणा हे दोघेही अमरावती जिल्ह्यातील आमदार आहेत. या दोघामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू होते. कडू यांनी राणा यांच्यावर खिसे कापून रेशन वाटत असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राणा यांनी कडू यांच्यावर गुहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप केला होता. यावरून दोघांमध्ये जोरदार संघर्ष उडाला होता. कडू यांनी राणा यांना आवरा अन्यथा १ नोव्हेंबरला भूमिका घेऊ असा इशारा दिला होता.राज्यभर चर्चा होत असलेल्या या वादाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल घेत दोघांना एकत्र आणून त्यांच्यात दिलजमाई घडवून आणली. यावेळी राणा यांनी आपले विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. बच्चू कडू हेही आपली भूमिका स्पष्ट करतील. सरकारचे समर्थक आमदार म्हणून दोघेही एकत्र काम करतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

आपल्या एका फोनवर कडू गुवाहाटीला – फडणवीस यांची कबुली

तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंदही संबंध नसल्याचा दावा करणारे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रवी राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्या वादानंतर आपला गुवाहाटी प्रकरणाशी संबंध असल्याचा स्पष्ट खुलासा केला . बच्चू कडू हे माझ्या केवळ एका फोनवर गुवाहाटीला गेले होते अशी स्पष्ट कबुली देताना , कडू यांनी कोणता सौदा केला असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांच्यावर आरोप लावणे चुकीचे होते. कारण त्यांनी कोणतेही गैरकृत्य केले नाही याची मला पूर्ण खात्री आहे असे फडणवीस म्हणाले तर रवि राणा यांनी देखील आपण जे बोललो ते रागाच्या भरात बोललो. आपण त्याबद्दल दिलगिर आहोत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर पडदा पडला असल्याचे फडणवीस म्हणाले.

Check Also

सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवन्ना मोदीशहांच्या नाकाखालून परदेशी पळाला

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *