Breaking News

आदीत्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात ? शिवसेना नेते खा.संजय राऊत यांचा सुतोवाच

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने थेट निवडणूक लढविली नाही. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अर्थात शिवसेना नेते आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून ही शक्यता शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी वर्तविली असल्याने यास महत्व आले आहे.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील अशा घडामोडी सध्या सुरु आहेत असं सूचक विधान खा.संजय राऊत यांनी नुकतच केले. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्यने विधानसभा निवडणूक लढवण्याची अशी मागणी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे ही चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
आदित्य ठाकरे राज्याचं नेतृत्त्व करणार का असं विचारलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, ‘उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून प्रतिष्ठा मिळवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील अशा घडामोडी, जडणघडण सध्या सुरु आहे.
यावेळी भाजपाकडे लोकसभेचं उपाध्यक्षपद अजिबात मागितलं नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *