Breaking News

एनसीबीचा दावाः आम्हीच क्रुजवर जावून कारवाई केली नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले

मुंबईः प्रतिनिधी
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर आर्यन खान, अरबाज मर्चंटवर करण्यात आलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवा गौप्यस्फोट करत एनसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे एनसीबीने तात्काळ पत्रकार परिषद बोलावित ती कारवाई एनसीबीनेच केल्याचा दावा केला.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांच्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई एनसीबीच्या टीमनेच केल्याचे सांगत तर त्याचा पंचनामाही तेथे क्रुजवरच करण्यात आला. या कारवाईसाठी के.पी.गोसावी आणि मनिष भानुशाली यांनी मदत केल्याची माहिती एनसीबीचे अधिकाऱ्याने तातडीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे हे ही उपस्थित होते.
यावेळी एनसीबीने पंचनामा करताना उपस्थित असलेल्या पंच मंडळींची नावेही वाचून दाखवित नियमानुसार करावाई करण्यात आल्याचे सांगत याशिवाय नवाब मलिक यांनी केलेले आरोप निराधार असल्याचा दावा एनसीबीने केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळताना जरी एनसीबीने कारवाई केल्याचा दावा केलेला असला तरी आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात नेताना एनसीबीचे अधिकारी कोणत्याही फ्रेममध्ये दिसत नाही. त्याचबरोबर या दोघांनाही एकामागून एक नेण्यात आले. यासंबधीचे व्हिडीओ ३ऑक्टोंबरच्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये मनिष भानुशाली आणि के.पी.गोसावी हे दोघेच दिसत आहेत. तसेच एनसीबीने किती वाजता क्रुजवर गेले तेथे त्यांना काय काय मिळाले, कितीजण होते याविषयीची संपूर्ण माहिती या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली नाही.
त्यामुळे एनसीबीने केलेला दावा योग्य वाटत नसून आर्यन खान आणि अरबाज मर्चंटवर करण्यात आलेली कारवाई संपूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात मराठी ई-बातम्या या संकेतस्थळाने यासंपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Check Also

“त्या” महिलेचा अखेर मृत्यू, जबाबही घेता आला नाही मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत घडलेल्या प्रकरणाची आठवण करून देणारी घटना मुंबईतील साकिनाका येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *